शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात धावणार पर्यटन विशेष बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:07 IST

दयानंद पाईकराव नागपूर : विदर्भात अनेक पर्यटनस्थळे आहेत. यात धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनस्थळांचा समावेश आहे. परंतु अद्याप या पर्यटनस्थळांसाठी ...

दयानंद पाईकराव

नागपूर : विदर्भात अनेक पर्यटनस्थळे आहेत. यात धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनस्थळांचा समावेश आहे. परंतु अद्याप या पर्यटनस्थळांसाठी एसटी महामंडळातर्फे विशेष बसेस सुरू करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे नववर्षात प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने विदर्भात पर्यटन विशेष बसेस चालविण्याची योजना आखली आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भात १२ बसेस चालविण्यात येणार असून, त्याचा श्रीगणेशा जानेवारी महिन्यात होणार आहे.

कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठीही एसटी महामंडळाकडे निधी उपलब्ध नव्हता. मात्र या परिस्थितीतून सावरत एसटी महामंडळाने उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. यात बसेसचे ट्रकमध्ये रूपांतर करून माल वाहतूक करणे, खासगी गाड्यांचे टायर रिमोल्डिंग करणे आदी उपक्रमांचा समावेश आहे. विदर्भात अनेक जिल्ह्यात धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटनस्थळांसाठी एसटीच्या बसेसही सोडण्यात येतात. परंतु पर्यटनासाठी विशेष बसेसचे नियोजन यापूर्वी एसटी महामंडळाने केले नव्हते. परंतु नववर्षात या पर्यटनस्थळांसाठी विशेष बसेस सुरू करण्यात येणार आहेत. यात दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, खिंडसी, रामटेक, माहूर, चिखलदरा, शेगाव, यवतमाळ जिल्ह्यातील सहस्रकुंड आदी स्थळांचा समावेश आहे. त्यानुसार एखाद्या धार्मिक स्थळावर जाण्यासाठी सकाळीच एसटीची विशेष बस सोडण्यात येईल.

प्रवासात प्रवाशांना भोजनासाठी पुरेसा वेळ देण्यात येईल. त्यानंतर दर्शनासाठी ठराविक वेळ देऊन दर्शन आटोपल्यानंतर भाविकांना पुन्हा त्यांच्या गावाला पोहोचविण्यात येणार आहे. तर नैसर्गिक पर्यटनस्थळीही पर्यटकांना पुरेसा कालावधी फिरण्यासाठी देऊन परत येण्याची वेळ सांगितली जाईल. प्रवासी आल्यानंतर ते बसमध्ये बसून आपल्या गावी परत येतील. या उपक्रमाला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पर्यटन विशेष बसेस सुरू करण्याचा मानस एसटी महामंडळाने व्यक्त केला आहे.

नागपुरातून सुरू होती फुलराणी

साधारणपणे सहा ते सात वर्षांपूर्वी नागपुरातून फुलराणी नावाची पर्यटन विशेष बस सुरू होती. यात सहा ते सात स्थळांचा समावेश होता. सकाळी बसमध्ये बसल्यानंतर पर्यटकांना सहा ते सात ठिकाणी घेऊन गेल्यानंतर सायंकाळी ही बस नागपुरात परत येत होती. या गाडीला प्रवाशांचा प्रतिसादही मिळत होता. परंतु कालांतराने ही बस बंद करण्यात आली होती.

पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल

‘विदर्भात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी एसटी महामंडळातर्फे पर्यटन विशेष बसेस सुरू करण्यात येणार आहेत. जानेवारी महिन्यात या बसेसची सुरुवात होणार आहे. यामुळे पर्यटकांना सुविधा होऊन परिणामी एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही भर पडणार आहे.

- शिवाजी जगताप, उपमहाव्यवस्थापक, नियंत्रण समिती ३, मुंबई