सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आंदोलनाचा एल्गार पुकारणार; शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा इशारा
By गणेश हुड | Updated: October 25, 2023 15:40 IST2023-10-25T15:40:04+5:302023-10-25T15:40:26+5:30
१ नोव्हेंबरला शेगाव येथून या मोर्चाला सुरवात तर २० नोव्हेंबरला बुलडाणा येथे मोर्चाचा समारोप करणार असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आंदोलनाचा एल्गार पुकारणार; शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा इशारा
नागपूर : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आपल्या आक्रमक आंदोलनामुळे चर्चेत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा सरकारच्या विरोधात आंदोलनाचा एल्गार पुकारणार आहेत. सोयाबीन, कापूस, धान व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची ताकद काय असते, हे सरकारला दाखवून देणार आहे. यासाठी एल्गार मोर्चा काढणार आहे. १ नोव्हेंबरला शेगाव येथून या मोर्चाला सुरवात तर २० नोव्हेंबरला बुलडाणा येथे मोर्चाचा समारोप करणार असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
रोगामुळे सोयाबीन, कापूस, संत्रा व धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सरकट एकरी १० हजार रुपये अनुदान द्या, सोयाबीनला सरसकट ८ रुपये क्विंटल तर कापसाला १२ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल तर धानाला २८०० रुपये भाव द्यावा, जंगला शेजारी असलेल्या शेतीला सिमेंट भिंतीचे कम्पाऊंड करून द्या, सरकारने घोषणा केल्या प्रमाणे नियमित कर्ज भरणाऱ्यांना शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी तुपकर यांनी नेली.
विदर्भातील एकही आमदार खासदार सोयाबीनच्या भावावर बोलायला तयार नाहीत. सोयाबीन, कापूस, धान व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर सरकारला जागेवर ठेवणार नाही. मंत्र्यांना गावात फिरणे मुश्कील करू असा इशारा त्यांनी दिला. महाराष्टृातील राजकारण खालच्या स्तरावर गेले आहे. जाती-जातीत, धर्मा-धर्मात भांडणे लावण्याचे प्रकार सुरू आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यावर २० नोव्हेंबर पर्यंत सरकारने निर्णय न घेतल्यास महाराष्ट्र पटविल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा तुपकार यांनी दिला. यावेळी संघटनेचे प्रशांत गावंडे, रवी पाटील, दशरथ राऊत, खुशाल शेंडे, सौरभ पडघाम, राहुल शेलार आदी उपस्थित होते.
विमा कंपन्यांकडून मंत्र्यांना हप्ते
सरकार व विमा कंपन्यांचे साटेलोटे आहे. विमा कंपन्याकडून मंत्र्यांना हप्ते जातात. नुकसान झाल्यानंतरही शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही. विमा हप्त्यातून कंपन्यांना किती पैसा मिळतो व नुकसान भरपाई म्हणून किती दिला जातो. याचे लेखा