नागपुरात नात्यांनी ओलांडल्या रेखा.. जावयाकडून सासऱ्याची हत्या, सावरगावात भावानेच केला भावाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 17:08 IST2025-05-12T17:07:03+5:302025-05-12T17:08:27+5:30

उधारीचे पैसे थकवल्याने भडकला जावई : घरगुती वादातून भावाचा घेतला जीव

Son-in-law kills father-in-law in Nagpur, brother kills brother in Savargaon | नागपुरात नात्यांनी ओलांडल्या रेखा.. जावयाकडून सासऱ्याची हत्या, सावरगावात भावानेच केला भावाचा खून

Son-in-law kills father-in-law in Nagpur, brother kills brother in Savargaon

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर/सावरगाव :
बदलत्या काळात नातेच नात्याच्या जीवावर उठत असल्याचे दुर्दैवी चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. नागपुरात उधारीचे पैसे थकविल्याच्या वादातून संतप्त जावयाने सासऱ्याचीच हत्या केली. डोक्यात वरवंटा घालून त्याने घरी भेट घेण्यासाठी आलेल्या सासऱ्याचा जीव घेतला. सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. तर नरखेड तालुक्यातील सावरगाव येथे भावानेच घरगुती कारणावरून शेतातील काम करणारे साहित्य असलेल्या फावड्याने भावाचा खून केला.


जनार्दन बिसन दमके (६५, कळमना, शिरसी, उमरेड), असे मृत सासऱ्याचे नाव आहे, तर गौतम जनार्दन बिसन दमके (६५, कळमना, शिरसी, उमरेड), असे मृत सासऱ्याचे नाव आहे, तर गौतम मात्र, आर्थिक स्थितीत ठीक नसल्याने ते पैसे परत करू शकले नाहीत. ५ मे रोजी सासू-सासरे पाहुणे म्हणून गौतमच्या घरी गेले होते. त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी चहा घेतल्यावर पैसे परत मागितले. सासऱ्यांनी परिस्थितीमुळे सध्या पैसे देऊ शकत नाही, असे सांगितले. 


यावरून संतापलेल्या गौतमने शिवीगाळ करत, वरवंट्याने त्यांच्या डोक्यात प्रहार केला. यात दमके गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात आणि तेथून मेडिकलमध्ये नेण्यात आले. उपचाराच्या दरम्यान १० मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी गौतमविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. 


झोपेतच भावाचा घेतला जीव

  • सावरगाव येथील घटनेत नरेंद्र भाऊराव चापले (२९) याचा जीव गेला. त्याचा मोठा राजेंद्र भाऊराव चापले (३१) याने त्याचा जीव घेतला. १० मे रोजी सकाळी अकरा वाजता नरेंद्रचे वडील भाऊराव हे बाजूच्या घरात गेले असता तेथे नरेंद्र हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. नरेंद्रला दवाखान्यात नेले असता त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी श्वानपथकाला बोलविले.
  • श्वानपथकाच्या संकेतानुसार राजेंद्रला २ ताब्यात घेण्यात आले. त्याने घरगुती वादातून नरेंद्रची हत्या केल्याची कबुली दिली. त्याने झोपेतच नरेंद्रवर फावड्याने प्रहार केल्याचे सांगितले. पाच तासांच्या आत पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एपीआय पवनराजे भांबूरकर, गणेश पडवार, अविनाश बाहेकर, गजानन तितरे, साबीर शेख, जालिंदर राठोड, किशोर निखाडे, केवल आडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Son-in-law kills father-in-law in Nagpur, brother kills brother in Savargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.