शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जि.प.कडून मंजुरी न मिळाल्यामुळे सोलरचा प्रकाश थांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 23:42 IST

दोन महिन्याहुन अधिक काळापासून जि.प.च्या शिक्षण विभागाने बदललेल्या शाळांची कुठलीही प्रशासकीय मंजुरी महाऊर्जाला उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे २८७ शाळांवर पडणारा सौर उर्जेचा प्रकाश अजूनही पडला नाही.

ठळक मुद्देसोलरद्वारे होणार होता २८७ शाळांमध्ये वीज पुरवठा४.८ कोटी रुपयांची होती योजना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे जिल्हा परिषदेच्या २०० च्या जवळपास शाळांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे तर जिल्हा प्रशासन दुसरीकडे २८७ शाळांमध्ये सोलरद्वारे वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न करीत आहे. जिल्हा परिषदेने यासाठी शाळांची निवडही केली. मात्र पुन्हा नाव बदलवून देण्यासाठी सोलर बसविण्याचे काम थांबविण्यात आले. दोन महिन्याहुन अधिक काळापासून जि.प.च्या शिक्षण विभागाने बदललेल्या शाळांची कुठलीही प्रशासकीय मंजुरी महाऊर्जाला उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे २८७ शाळांवर पडणारा सौर उर्जेचा प्रकाश अजूनही पडला नाही.जिल्हा परिषदेच्या २०० च्या जवळपास शाळांचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केला आहे. या शाळांनी विजेचे बिलच भरलेले नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वीज बिल भराच्या कटकटीपासून शाळांना मुक्ती मिळवून देण्यासाठी शाळा सोलरवर करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात २८७ शाळांचा समावेश करण्यात आला. त्यासाठी ४.८० कोटी रुपयांची तरतूद खनिज निधीतून करण्यात आली. महाऊर्जाकडे निधीचे हस्तांतरणही करण्यात आले. त्यानंतर महाऊर्जाने सर्वेक्षण करून २८७ शाळांची निवड केली. त्यासंदर्भात निविदाही काढण्यात आली. परंतु शिक्षण विभागाने शाळेच्या निवडीवरून आक्षेप घेतला व काही शाळा बदलून नवीन यादी दिली. परंतु महाऊर्जाने नवीन यादीला प्रशासकीय मंजुरी देण्यासंदर्भात मागणी केली. परंतु तीन महिन्यानंतरही शिक्षण विभागाने प्रशासकीय मंजुरी मिळविली नाही. जि.प.कडून सांगण्यात येत आहे की, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रशासकीय मंजुरी मिळू शकली नाही. विशेष म्हणजे जि.प.च्या शाळा सौरऊर्जेवर आणण्याचा मानस होता. नागपूर जिल्ह्यात जि.प.च्या १५३१ शाळा आहे. यात पहिल्या टप्प्यात खनिज निधीमधुन २८७ शाळा सौर ऊर्जेवर येणाऱ्या होत्या.२००च्या जवळपास शाळा अंधारातजि.प.च्या शाळांना महावितरणद्वारे वीज पुरवठा होतो. परंतु अनेक शाळांनी नियमित वीज बिल भरले नाही. त्यामुळे महावितरणने शाळेचा वीज पुरवठा खंडित केला. २०१६ पासून काही शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या शाळा मतदानाचे केंद्र होत्या. तेव्हा प्रशासनाने तात्पुरती विजेची व्यवस्था शाळेत केली होती. मात्र त्यावर कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात प्रशासन असमर्थ आहे.पालकमंत्र्यांचे विशेष प्रयत्नगत काही महिन्यांपासून जि.प.च्या सुमारे २०० शाळांचा थकीत वीज देयकापोटी वीज पुरवठाच खंडित करण्यात आला असल्याची माहिती आहे. या शाळाही सौर उर्जेच्या प्रकाशावर आणण्यासाठी शासनस्तरावरुन प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. शाळा सौर पॅनलच्या माध्यमातून प्रकाशमय करण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष प्रयत्न केले होते. मात्र, परंतु नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात बावनकुळे राहतील की नाही, याची साशंकता आहे. त्यामुळे या शाळांचे भवितव्य काय असणार हे सांगणे कठीण झाले आहे.

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरSchoolशाळा