शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एसएनडीएलची पुन्हा चौकशी

By admin | Updated: December 24, 2015 03:27 IST

वीज वितरण फ्रेन्चायसी एसएनडीएलच्या कामकाजाची तपासणी करण्यासाठी नेमण्यात आलेली उच्चस्तरीय समिती पुन्हा एकदा चौकशी करेल,

बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा नागपूर : वीज वितरण फ्रेन्चायसी एसएनडीएलच्या कामकाजाची तपासणी करण्यासाठी नेमण्यात आलेली उच्चस्तरीय समिती पुन्हा एकदा चौकशी करेल, अशी घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत बुधवारी केली. करारानुसार तीन वेळा नोटीस देऊनही सुधारणा न झाल्यास करार रद्द केला जाऊ शकतो. चौकशीत गडबड आढळली तर सरकार नक्कीच कारवाई करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रश्नोत्तराच्या तासात आ. विकास कुंभारे, सुधाकर कोहळे यांनी यासंबंधीचा उपप्रश्न उपस्थित केला होता. कुंभारे म्हणाले, एसएनडीएल नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात वसुली करीत आहे. एसएनडीएलच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीनेही यावर आक्षेप घेत एसएनडीएलला फटकारले आहे. त्यामुळे या कंपनीचा करार रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली. आ. सुधाकर कोहळे यांनी देखील हा मुद्दा लावून धरत एसएनडीएलच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर उत्तर देताना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधी व नागरिकांचा रोष पाहता एसएनडीएलच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली होती.या समितीने एसएनडीएलला दोन महिन्यांची नोटीस देऊन कामकाजात सुधारणा करण्याची ताकीद दिली आहे. नोटीस कालावधीनंतर समिती पुन्हा चौकशी करेल. त्यानंतरही सुधारणा झाली नाही तर पुन्हा तिसऱ्यांदा नोटीस दिली जाईल. यानंतरही सुधारणा न झाल्यास करार रद्द केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)