हावडा अहमदाबाद एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी; तीन लाखांचा, १५ किलो गांजा जप्त

By नरेश डोंगरे | Published: April 9, 2024 11:47 PM2024-04-09T23:47:09+5:302024-04-09T23:47:38+5:30

आमगाव आणि गोंदिया दरम्यान धावत्या रेल्वेत आरपीएफची कारवाई

Smuggling of Ganja from Howrah Ahmedabad Express; Three lakhs, 15 kg ganja seized | हावडा अहमदाबाद एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी; तीन लाखांचा, १५ किलो गांजा जप्त

हावडा अहमदाबाद एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी; तीन लाखांचा, १५ किलो गांजा जप्त

नागपूर : हावडा अहमदाबाद एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी करण्याचा प्रयत्न रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) हाणून पाडत गांजाचे सात पॅकेट जप्त केले. आमगाव आणि गोंदिया दरम्यान धावत्या रेल्वे गाडीत आरपीएफने सोमवारी ही कारवाई केली.

देशभरात लोकसभा निवडणूकीचा रणसंग्राम सुरू आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांमधून मोठी रोकड, अंमली पदार्थ आणि अशीच वेगवेगळी खेप ईकडून तिकडे केली जात असल्याचे लक्षात घेऊन दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी विशेष तपासणी पथके तयार केली आहेत. विविध रेल्वे गाड्यांमध्ये ही पथके तपासणी आणि कारवाई करतात. सोमवारी हावडा अहमदाबाद एक्सप्रेस नागपूरकडे येत असताना आमगाव-गोंदियाच्या मध्ये तिसऱ्या जनरल कोचमध्ये एका सीटखाली तीन बॅग ठेवून दिसल्या. संशय आल्याने या बॅग कुणाच्या आहेत, अशी कोचमधील प्रवाशांना विचारणा केली असता त्यांनी अनभिज्ञता दर्शविली. त्यावरून गोंदिया स्थानकावर त्या बॅग उतरवून त्यांची तपासणी करण्यात आली. बॅगमध्ये गांजाची सात पाकिटं आढळली. त्यात एकूण १४ किलो ५३४ ग्राम गांजा होता. अंमली पदार्थाच्या बाजारात त्याची किंमत २ लाख, ९० हजार, ६८० रुपये एवढी आहे. हा गांजा कुणी कुुठून आणला आणि तो कुठे नेणार होता, हे मात्र आरोपी हाती न लागल्याने स्पष्ट होऊ शकले नाही.

ऑपरेशन नार्कोस सुरू

या संबंधाने आयुक्त दीपचंद आर्य यांनी अंमली पदार्थांची रेल्वे गाड्यांमधून होणारी तस्करी थांबविण्यासाठी 'ऑपरेशन नार्को'स राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. सोमवारच्या कारवाईत पीएसआय अजय चाैबे, प्रधान आरक्षक जी. आर. मडावी, आरक्षक विकास पटले, डी. एन. यादव यांची सतर्कता कामी आल्याचेही आर्य यांनी सांगितले.

Web Title: Smuggling of Ganja from Howrah Ahmedabad Express; Three lakhs, 15 kg ganja seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.