शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नाग नदीला येणार स्मार्ट लुक

By admin | Updated: March 15, 2016 04:48 IST

उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. परंतु नाग नदीच्या प्रदूषणामुळे यात बाधा निर्माण झाली आहे;

नागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. परंतु नाग नदीच्या प्रदूषणामुळे यात बाधा निर्माण झाली आहे; सोबतच गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी प्रदूषित होत आहे. ही बाब विचारात घेता १४७६.९६ कोटींचा नाग नदी प्रदूषण कमी करण्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. नागपूर शहरातील सर्व नद्यांचे पुनरुज्जीवन प्रकल्पाकरिता १२६ कोटींचा प्रकल्प अहवाल यापूर्वी राज्य शसानाने शिफारशीसह केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाकडे सादर केला होता. केंद्र शासनाने हा प्रस्ताव आयआयटी रुरकी यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविला होता. त्यावर चर्चा करून महापालिकेने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रुरकी यांच्या निर्देशाप्रमाणे नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाऐवजी नाग नदी प्रदूषण कमी करण्याचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या अहवालात उत्तर व मध्य सिवरेज झोनमध्ये निर्मित संपूर्ण सिवरेजचे संकलन व नि:सारण व्यवस्थापन करणे, नाग नदीतील सांडपाण्याच्या स्रोतांचा शोध घेऊ न सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, प्रक्रिया केलेले सांडपाणी परत नदीत सोडून नदी मलमुक्त करण्याचा समावेश आहे. (प्रतिनिधी)आठ वर्षांनंतर प्रकल्प अहवालनाग नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेतील नागपूर विकास आघाडीने अनेक योजना तयार केल्या, तसेच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. परंतु प्रदूषणाला आळा बसलेला नाही. आता आठ वर्षांनंतर नाग नदी प्रदूषण कमी करण्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.३३९ कोटींचा घनकचरा प्रकल्पस्वच्छ भारत मिशनअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी शहरातील एकीकृत घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प राज्य शासनाकडे सादर करावयाचा आहे. त्यानुसार ३३९ क ोटींचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल सभागृहापुढे मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. नदीकाठच्या भागाचा विकासनागनदीचे प्रदूषण कमी करण्याचा प्रकल्प अहवाल सभागृहाच्या मंजुरीनंतर राज्य सरकारमार्फत केंद्र शासनाकडे पाठविला जाईल. या प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यास नागनदीचे अस्तित्व कायम राहील. सोबतच शहरातील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या प्रकल्पात नागनदीचा काठचा भाग विकसित केला जाणार आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडेल.