शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यापासून वृद्ध आई-वडील मुलाच्या शोधात

By admin | Updated: November 13, 2015 02:47 IST

अभ्यासात अतिशय हुशार असलेल्या मुलाच्या शोधात वृद्ध आई-वडील मागील सहा महिन्यांपासून पोलीस ठाण्याचा चकरा मारत आहेत.

पोलीस ठाण्याच्या मारताहेत चकरा : पोलिसांनी साधले मौननागपूर : अभ्यासात अतिशय हुशार असलेल्या मुलाच्या शोधात वृद्ध आई-वडील मागील सहा महिन्यांपासून पोलीस ठाण्याचा चकरा मारत आहेत. परंतु पोलिसांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांच्या हाती केवळ निराशा आली आहे. इतरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले या वृद्ध दाम्पत्याना स्वत:च्या मुलाच्या शोधासाठी इतरांच्या मदतीची वाट पाहावी लागत आहे. मोहननगर येथील जयप्रकाश चौरसिया यांना राष्ट्रीय सेवेसाठी प्रधानमंत्री कार्यालयातून प्रशस्तीपत्र मिळाले आहे. महाराष्ट्र पोलीस महानिदेशकांतर्फे प्रशंसापत्र आणि जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे प्रशस्तीपत्र मिळाले आहे. महानगरपालिकेनेही त्यांना राष्ट्रीय सेवा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. अशा या सेवाभावी व्यक्तीला आपल्या मानसिक रुग्ण असलेल्या मुलाला शोधण्यासाठी दिवस रात्र फिरावे लागत आहे. इतकेत नव्हे त्यांनी मुलाच्या शोधासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. चौरसिया यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, त्यांचा मुलगा अखिल चौरसिया हा व्हीएसपीएम कॉलेज नागपूर येथून फिजियोथेरेपीचा कोर्स करीत आहे. ९ वी व १० वीत त्याने चांगले गुण घेतले. अकरावीमध्ये शरीररचना विषयात चांगले गुण घेतले परंतु द्वितीय वर्षात मात्र तो या विषयात उत्तीर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे त्याची मानसिक स्थिती बिघडली. त्याचा उपचार सुरु होता. २००८ पासून तो औषध घेत आहे. तो जेव्हाही घरून बाहेर जायचा वडिलांना सांगून जात असे. परंतु १२ मे २०१५ रोजी तो घरून बाहेर पडला तेव्हा त्याच्याजवळ ना मोबाईल होता ना औषध. लगेच परत येतो असे सांगून तो गेला, तेव्हापासून तो परतलाच नाही. पोलिसात तक्रार केली. परंतु काहीच कारवाई झाली नाही. दर दोन दिवसांनी ते पोलीस ठाण्यात जाऊन विचारपूस करतात, परंतु सहा महिने लोटूनही मुलाचा पत्ता लागलेला नाही. (प्रतिनिधी)उपोषणाचा इशारा पोलिसांनी त्यांच्या मुलाला शोधण्यासाठी कुठलेही विशेष प्रयत्न केले नाहीत. त्यांच्या मुलाला शोधण्यासाठी येत्या सात दिवसात ठोस पाऊल उचलले नाही, तर उपोषणावर बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.