शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेहाशेजारी बसून पाहिला आंबटशौकिनांनी सिनेमा

By admin | Updated: April 2, 2017 02:42 IST

अश्लील चित्रपट बघताना हृदयविकाराचा झटका येऊन एका निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

विजय टॉकीजमधील घटना : लक्षात आल्यानंतरही बाजूच्यांचे दुर्लक्ष नागपूर : अश्लील चित्रपट बघताना हृदयविकाराचा झटका येऊन एका निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. विजय टॉकीजमध्ये शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे, त्याच्या मृतदेहाशेजारी बसून आंबटशौकिनांनी सिनेमा बघितला. मृत व्यक्ती निवृत्त सरकारी कर्मचारी होता. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तो दुपारी ३ च्या सुमारास तन मन धन हा चित्रपट बघायला गेला होता. सिनेमा बघताना त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने तो खुर्चीवरून खाली कोसळला. मात्र, त्याच्या आजूबाजूची मंडळी नको ती दृश्य बघण्यात गुंंग असल्याने त्याच्याकडे कुणी लक्षच दिले नाही. दुपारी ४.३० च्या सुमारास मध्यंतर झाल्यानंतर त्याच्या आजूबाजूच्या आंबटशौकीन प्रेक्षकांना तो निपचित पडून दिसला. काही जणांनी दारूच्या नशेत पडून असावा, असे समजून त्याला ओलांडले तर, जाण्या-येण्याला अडसर होत असल्यामुळे त्याला काही जणांनी उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून प्रेक्षकांतील काहींनी चित्रपटगृहाच्या कर्मचाऱ्यांना त्याची माहिती दिली. दरम्यान, पुन्हा सिनेमा सुरू झाला. कर्मचाऱ्यांनी जवळ येऊन बघितले तेव्हा तो व्यक्ती मृत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तशाही अवस्थेत चित्रपट बघण्यात आंबटशौकीन प्रेक्षक गुंग होते. माहिती कळताच गणेशपेठ पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी चित्रपटगृहातून त्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला. तो मेयोत पाठविला. मोबाईल आणि ओळखपत्रावरून त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. त्यानंतर नातेवाईक पोहोचले. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. चित्रपटगृहात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याचे व्यवस्थापकांनी पोलिसांना सांगितले.(प्रतिनिधी)