शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान विरोधात सिंधी समाजात रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 23:40 IST

पाकिस्तानातील घोटकी येथे हिंदू( सिंधी व पंजाबी) लोकांवर अत्याचार होत आहे. डॉ. निमृता चंदानी यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आल्याने शहरातील सिंधी समाजात प्रचंड रोष आहे.

ठळक मुद्देजरीपटक्यात सभा : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेवटर्कनागपूर : पाकिस्तानातील घोटकी येथे हिंदू( सिंधी व पंजाबी) लोकांवर अत्याचार होत आहे. डॉ. निमृता चंदानी यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आल्याने शहरातील सिंधी समाजात प्रचंड रोष आहे. या अत्याचाराच्या विरोधात नागरिकांनी भारतीय सिंधू सभा व विदर्भ सिंधी विकास परिषदेच्या बॅनरखाली गुरुवारी जरीपटका येथील वसनशाह चौक येथे सभा घेऊन पाकिस्तानाच्या विरोधात रोष व्यक्त केला. समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना निवेदन सादर क रून पाकिस्तानातून विस्थापित होणाऱ्यांना केंद्र सरकारने आश्रय देण्याची मागणी केली.जरीपटका येथील सभेला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाची पंचायत, दरबारांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. भारतीय सिंधू सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष घनश्याम कुकरेजा यांनी प्रास्ताविकातून पाकिस्तानात मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा निषेध केला. या विरोधात सर्व सिंधी समाज एकजूट होईल असा विश्वास व्यक्त केला. सभेत ५० हून अधिक पंचायती व संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.यावेळी मोहन मंजानी, दौलत तुंगवानी, घनश्याम गोदानी, दिलीप चावला, घोटकी पंचायतचे अध्यक्ष वलीराम सहजरामानी,आरएसएसचे अनिल भारद्धार, भगवानदास अडवाणी आदी उपस्थित होते.सभेनंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. केंद्र सरकारने पाकिस्तानातील घटनांची दखल घ्यावी, मानवाधिकाराचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करावा, पाकिस्तातून विस्थापित झाल्यास भारत सरकारने त्यांना मदत करावी, अशी मागणी केली.शिष्टमंडळात घनश्याम कुकरेजा, मनपाच्या आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, विदर्भ सिंधी विकास परिषदचे अध्यक्ष डॉ. विंकी रुखवानी, महासचिव पी.टी. दारा, नाग विदर्भ सिंधी सेंट्रल पंचायतचे अध्यक्ष सुरेश जग्यासी, भारतीय सिंधू सभेचे गोपाल खेमानी व प्रा. विजय केवलरामानी आदींचा समावेश होता.पाक दूतावासाला घेराव करणारभारतीय सिंधू सभेच्या देशभारात ३०० संस्था आहेत. सर्व ठिकाणी निदर्शने होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली जात आहे. नोव्हेंबरमध्ये दिल्ली येथील पाकिस्तानच्या दूतावासाला घेराव घातला जाईल. अशी माहिती मनपाच्या आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावापाकिस्तानातील हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात गुरुवारी धरणे देण्यात आली. पंतप्रधान व गृहमंत्र्यांनी यात तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली. यात आंतरराष्ट्रीय सिंधू सेवा संगम व नागपूर सेंट्रल सिंधी पंचायतचे अध्यक्ष प्रताप मोटवानी, समाजसेवी विजय केवलरामानी प्रदीप पंजवानी, उपाध्यक्ष कैलास केवलरामानी, महेश बठेजा, महासचिव विनोद जेठानी, कार्यकारी सचिव महेश ग्वालानी, प्रचार सचिव राजेश धनवानी, सचिव भारत पारवानी, मनीष दासवानी, ठाकूर आनंदानी, श्रीचंद चावला, राजेश बटवानी, राजू ढोलवानी, संतोष डेम्बला, कमल हरियाणी, सुरेश बुधवानी, विशाल कुमार, सुरेश खिलवानी, महेश मेघानी, घनश्याम लालवानी आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :agitationआंदोलनPakistanपाकिस्तान