गर्दीने गजबजलेल्या नागपूर रेल्वेस्थानकावर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 12:05 AM2020-07-12T00:05:42+5:302020-07-12T00:07:21+5:30

कोरोनामुळे आलेल्या संकटाचा सामना जगभरात करण्यात येत आहे. रेल्वेही यापासून दूर नाही. नागपूर रेल्वेस्थानकावर २२ मार्चपूर्वी पाय ठेवायलाही जागा राहत नव्हती. परंतु आता तेथे मोजक्याच रेल्वे गाड्या येत आहेत. रेल्वेस्थानकाच्या बाहेरील परिसरात गर्दी नसून बाहेरील दुकानेही बंद आहेत.

Silence at the crowded Nagpur railway station | गर्दीने गजबजलेल्या नागपूर रेल्वेस्थानकावर शुकशुकाट

गर्दीने गजबजलेल्या नागपूर रेल्वेस्थानकावर शुकशुकाट

googlenewsNext
ठळक मुद्देप्लॅटफॉर्म रिकामे, स्टॉल बंद , बाहेरही नाही प्रवाशांची गर्दी

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे आलेल्या संकटाचा सामना जगभरात करण्यात येत आहे. रेल्वेही यापासून दूर नाही. नागपूर रेल्वेस्थानकावर २२ मार्चपूर्वी पाय ठेवायलाही जागा राहत नव्हती. परंतु आता तेथे मोजक्याच रेल्वे गाड्या येत आहेत. रेल्वेस्थानकाच्या बाहेरील परिसरात गर्दी नसून बाहेरील दुकानेही बंद आहेत.
रेल्वे स्थानकाच्या बाहेर मोजकेच ऑटोवाले उभे राहात असल्याचे चित्र दिसले. या परिसरातील एका धार्मिक स्थळावर एकही भाविक दिसला नाही. 'लोकमत'च्या प्रतिनिधीने रेल्वे स्थानकाचा आढावा घेतला असता रेल्वे स्थानकावर काही पोलीस, काही रेल्वे कर्मचारी आणि खूप कमी प्रवासी दिसले. कोरोनामुळे रेल्वेच्या कामकाजाची पद्धती बदलली आहे. यापूर्वी कुणीही सहज प्लॅटफॉर्मवर जाऊ शकत होता. परंतु आता सुरक्षित अंतर ठेवून रेल्वे स्थानकात प्रवेश करावा लागतो. पावसाळ्याचा काळ असल्यामुळे प्रवासी भिजू नयेत यासाठी तंबू लावण्यात आले आहेत. रेल्वे स्थानकावर प्रीपेड ऑटो बूथ, आरक्षण कार्यालय आणि चालू तिकीट कार्यालयावर गर्दी दिसली नाही. रेल्वेस्थानकावरील खाद्यपदार्थांचे स्टॉल ही बंद होते.

पूर्वेकडील प्रवेशद्वाराकडून 'नो एन्ट्री'
कोरोनापूर्वी पूर्वेकडील प्रवेशद्वारातून असंख्य प्रवासी आज येत होते. परंतु आता या परिसराला काही प्रमाणात सील करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना फिरुन रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करावा लागत आहे.

दुकाने झाली बंद
रेल्वेस्थानकाच्या समोरील हॉटेलमधून केवळ पार्सल मिळत आहे. हे हॉटेल काही वेळासाठी उघडत आहेत. काही प्रवाशांना भोजनाची गरज पडल्यास त्यांना अडचण होत आहे.

Web Title: Silence at the crowded Nagpur railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.