शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिकलसेलचे रुग्ण संकटात

By admin | Updated: June 29, 2015 03:03 IST

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या राज्य प्रमुखाने सार्वजनिक आरोग्य मंत्रालयास सिकलसेलग्रस्तांच्या सर्व प्रकारच्या आरोग्य समस्यांचे निवारण ....

नागपूर : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या राज्य प्रमुखाने सार्वजनिक आरोग्य मंत्रालयास सिकलसेलग्रस्तांच्या सर्व प्रकारच्या आरोग्य समस्यांचे निवारण करण्याचे प्रावधान असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु या योजनेत पात्र असलेल्या तब्बल ५० ते ६० सिकलसेलग्रस्तांचे हिप जॉर्इंट बदलविण्यास इस्पितळांनी चक्क नकार दिला आहे. या आजाराचा योजनेत समावेशच नसल्याचे इस्पितळांचे म्हणणे आहे, परिणामी यासारखे अनेक रुग्ण अडचणीत आले आहेत.राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला २ जानेवारी २०१२ रोजी पत्र दिले. यात ८५७, ७६७ ते ७७० व ७८० ते ७९९ अन्वये सिकलसेलग्रस्तांच्या सर्व प्रकारच्या आरोग्य समस्यांचे निवारण करण्याचे प्रावधान असल्याची माहिती दिली. परंतु या योजनेत पात्र असलेले सिकलसेलचे रुग्ण ज्यांचे हिप जॉर्इंट पूर्णपणे बदलण्याची गरज आहे, त्यांना संबंधित इस्पितळाने उपचारास नकार दिला. योजनेत हा आजारच नसल्याचे सांगितले. यासंदर्भात सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, योजनेचे राज्य प्रमुख, अभियान संचालक व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान प्रमुखास १६ मार्च २०१४ रोजी पत्र लिहून रुग्णांवरील अन्यायाबाबत पुनर्विचार करावा, अशी विनंती केली. यासोबतच महाराष्ट्रातील १० जिल्ह्यातील ४४ सिकलसेलग्रस्त रुग्णांचे ‘हिप जॉर्इंट’ बदलविण्याची यादीसुद्धा सादर केली. धक्कादायक म्हणजे, या पत्रावर राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त व संचालकांनी असे उत्तर दिले की, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत येत असलेल्या ९७२ मधील अनुक्रमांक ७६७ ते ७७० मध्ये हिप जॉर्इंटवर शस्त्रक्रिया करणे शक्य असले तरी अद्याप काही तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य नाही. यामुळे सिकलसेलग्रस्तांसाठी जीवनदायी आरोग्य योजना मरणदायी ठरू पाहत आहे. (प्रतिनिधी)