धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 14:50 IST2025-10-04T14:46:44+5:302025-10-04T14:50:49+5:30

मेडिकलमध्ये ४ मुले व्हेंटिलेटरवर : मध्य प्रदेशातील 'परासिया' गावातून उपचारासाठी आली १४ मुले

Shocking incident; Eight children die after taking 'cough syrup'! What was the cause of their deaths? | धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?

Shocking incident; Eight children die after taking 'cough syrup'! What was the cause of their deaths?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
ज्या औषधातून लहान मुलांना आराम मिळतो, तेच औषध जीवघेणे ठरत असल्याची अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील परासिया गावातून सर्दी-खोकल्यावरील कफ सिरप घेतल्यानंतर गंभिरावस्थेत नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दाखल झालेल्या १४ मुलांपैकी ६ जणांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नागपूर 'एम्स' आणि काही खासगी रुग्णालयातही दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने हा आकडा आठवर पोहोचला असल्याची माहिती आहे.

नागपूर मेडिकलच्या बालरोग विभागात २६ ऑगस्ट रोजी परासिया गावातून कफ सीरपमुळे गंभीर झालेला पहिला रुग्ण दाखल झाला होता. त्यानंतर २ ऑक्टोबरपर्यंत एकूण १४ मुले भरती झाली आहेत. या सर्व बालकांचे वय दीड ते ९ वर्षांदरम्यान आहे. प्राप्त माहितीनुसार, स्थानिक डॉक्टरांनी या मुलांना 'कोल्ड्रिफ' नावाचे कफ सिरप दिले होते. सुरुवातीला बरे झाल्यानंतर आठवड्याभरात त्यांची प्रकृती अचानक गंभीर झाली. मेडिकलमध्ये मृत्यू झालेल्या सहाही मुलांचा मृत्यू हा किडनी निकामी झाल्यामुळे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

सध्या मेडिकलच्या बालरोग विभागात सहा मुले भरती असून, त्यापैकी चार मुले व्हेंटिलेटरवर आहेत. किडनी विकारामुळे त्यांच्यावर डायलिसिसचे उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे मेडिकलच्या बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. मनीष तिवारी यांनी सांगितले.

मध्य प्रदेश एफडीएची तपासणी, औषधांवर बंदी

या गंभीर घटनेनंतर मध्य प्रदेश अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने मेडिकलमधील बालरोग विभागाला भेट दिली. त्यांनी रुग्णांच्या नातेवाइकांकडून संबंधित कफ सिरपची पाहणी करण्याचा प्रयत्न केला.औषधांच्या बॉटल सीलबंद नसल्याने ते नमुने घेऊ शकले नाहीत. मात्र, मध्य प्रदेशात या संबंधित कफ सीरपच्या बॅचेसच्या विक्रीवर तत्काळ बंदी घालण्यात आली आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कफ सिरप देऊ नका

कोणत्याही प्रकारचे कफ सिरप, विशेषतः कोरड्या खोकल्यासाठी दिले जाणारे सिरप, चार वर्षांखालील मुलांना डॉक्टरांच्या लेखी सल्ल्याशिवाय अजिबात देऊ नका. जर मुलाला लघवी होत नसल्यास, श्वसनाचा त्रास, खूप झोप येणे किंवा फिट्स आल्यास त्वरित डॉक्टरांना भेटावे. डॉक्टरांनीही लहान मुलांना कफ सिरप विचारपूर्वक द्यावे आणि योग्य डोसेसचा विचार करावा.
- डॉ. वसंत खळतकर, राष्ट्रीय अध्यक्ष, इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स

Web Title : खांसी की दवाई से आठ बच्चों की मौत; कारण की जांच जारी।

Web Summary : छिंदवाड़ा, मध्य प्रदेश के बच्चों में खांसी की दवाई से कथित तौर पर गुर्दे खराब होने से त्रासदी। नागपुर के अस्पतालों में आठ की मौत। अधिकारी 'कोल्ड्रिफ' सिरप की जांच कर रहे हैं, मध्य प्रदेश में इसकी बिक्री पर प्रतिबंध लगा दिया गया है। डॉक्टर छोटे बच्चों को खांसी की दवाई देने में सावधानी बरतने की सलाह देते हैं।

Web Title : Cough syrup claims eight children's lives; cause investigated.

Web Summary : Tragedy struck as cough syrup allegedly caused kidney failure in children from Chhindwara, MP. Eight died in Nagpur hospitals. Authorities investigate the 'Coldrif' syrup, banning its sale in Madhya Pradesh. Doctors advise caution administering cough syrup to young children.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.