लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे देणाऱ्या येणारा स्वा. सावरकर गौरव पुरस्कार यंदा भारतीय वायुसेनेचे माजी उपप्रमुख एअर मार्शल शिरीष देव यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात होणार आहे. सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर उपस्थित राहणार आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}