कलियुगी आई, प्रियकराकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 13:08 IST2023-10-14T13:05:00+5:302023-10-14T13:08:03+5:30

प्रियकराच्या कुकृत्यात आईची मदत : आरोपी फरार

sexual abuse of minor girls by boyfriend; Mother help in boyfriend's misdeeds | कलियुगी आई, प्रियकराकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार

कलियुगी आई, प्रियकराकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार

नागपूर : प्रेयसीला दारू पाजून तिच्या दोन अल्पवयीन मुलींवर प्रियकराने अत्याचार केल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मुलींच्या आईला ही बाब माहिती होती व तिने प्रियकराला या कुकृत्यात मदत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणातील आरोपी फरार आहे.

रोहित चौरे (३०, कळमना) असे आरोपीचे नाव असून, तो मजूर म्हणून काम करतो. त्याची प्रेयसी हीदेखील अगोदर मजुरीची कामे करायची. तिची रोहितसोबत ओळखी झाली होती. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. तिला १६ व १४ वर्षांच्या दोन मुली असून, पतीचे निधन झाले आहे. रोहित अनेकदा तिच्या घरी जायचा व तिथेच दारू प्यायचा. जून २०२२ मध्ये त्याने १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केला.

आईच्या भरवशावरच घर चालत असल्याने व रोहित तिचा मित्र असल्याने मुलीने याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्याचा गैरफायदा उचलत रोहितने मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर त्याने लहान मुलीवरदेखील अत्याचार केले. या प्रकाराची त्या मुलींच्या आईला माहिती होती. मात्र, तिने त्याला विरोध केला नाही. रोजच्या त्रासामुळे मुली कंटाळल्या होत्या. त्यातूनच एका मुलीने घरातून पळ काढला. ४ ऑक्टोबर रोजी महिलेने मुलगी हरविल्याची तक्रार जरीपटका पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. १० ऑक्टोबर रोजी ती मुलगी पोलिसांना सापडली. पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता हे वास्तव समोर आले. पोलिसांनी मुलीचे बयान नोंदवून घेत तिच्या आईला ताब्यात घेतले, तर प्रियकराचा शोध सुरू आहे.

Web Title: sexual abuse of minor girls by boyfriend; Mother help in boyfriend's misdeeds