सात हजार ‘रेमडेसिविर’ आले, रुग्णांना मात्र प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:07 IST2021-04-13T04:07:44+5:302021-04-13T04:07:44+5:30

नागपूर : ‘कोरोना’वर उपचारासाठी ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचा वापर करण्यात येत असून, मागील काही दिवसापासून याचा प्रचंड काळाबाजार सुरू आहे. मागील ...

Seven thousand ‘remedicivir’ came, but the patients were just waiting | सात हजार ‘रेमडेसिविर’ आले, रुग्णांना मात्र प्रतीक्षाच

सात हजार ‘रेमडेसिविर’ आले, रुग्णांना मात्र प्रतीक्षाच

नागपूर : ‘कोरोना’वर उपचारासाठी ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचा वापर करण्यात येत असून, मागील काही दिवसापासून याचा प्रचंड काळाबाजार सुरू आहे. मागील दोन दिवसात शहरात सात हजार ‘रेमडेसिविर’चे ‘डोस’ आले आहेत. मात्र तरीदेखील रुग्णांचे नातेवाईक मात्र इंजेक्शन मिळावे यासाठी पायपीट करीत आहेत.

‘रेमडेसिविर’चा तुटवडा असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मायलन/व्हिटारिस इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोमजाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. गडकरींच्या विनंतीवरून कंपनीने नागपूरला तत्काळ चार हजार ‘रेमडेसिविर’चे डोस पोहचते केले. ‘सनफार्मा’नेदेखील दोन दिवसात तीन हजार ‘डोस’ पोहोचविले. प्रशासनाकडूनदेखील ‘रेमडेसिविर’चा तुटवडा सोमवारपासून दूर होईल, असे आश्वासन देण्यात आले होते.

प्रत्यक्षात ‘कोरोना’बाधितांच्या नातेवाईकांकडून यासाठी प्रचंड पायपीट सुरू आहे. सोमवारीदेखील असेच चित्र होते. एका फार्मसीतून दुसऱ्या फार्मसीत विचारणा होत होती. ज्या खाजगी इस्पितळांत फार्मसी आहे तेथेदेखील याचा तुटवडा होता. अशास्थितीत गडकरींच्या प्रयत्नातून आलेले ‘रेमडेसिविर’ प्रशासन रुग्णांपर्यंत कधी पोहोचविणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Seven thousand ‘remedicivir’ came, but the patients were just waiting