शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

एडकाच्या मृत्यूला कारणीभूत अधिकाऱ्याची सेवाबहाली

By admin | Updated: August 8, 2015 02:55 IST

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या एडका मासा आत्राम या आदिवासी तरुणाच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आणि न्यायालयाने शिक्षा सुनावल्यामुळे ...

पदोन्नतीचेही प्रयत्न : पोलीस दलात चर्चेला उधाण नरेश डोंगरे  नागपूरदेशभरात खळबळ उडवून देणाऱ्या एडका मासा आत्राम या आदिवासी तरुणाच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आणि न्यायालयाने शिक्षा सुनावल्यामुळे सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची सेवाबहाली सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. सेवाबहालीनंतर पदोन्नतीच्या निमित्ताने सुरू असलेल्या हालचालीमुळे हे प्रकरण नव्याने चर्चेला आले आहे.दीपक कृष्णा डेकाटे असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून तो सध्या वाशिममध्ये सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. १९९२ ला डेकाटे गडचिरोली जिल्ह्यातील भागरागड पोलीस ठाण्यात पीएसआय म्हणून कार्यरत होता. त्यावेळी नक्षलवाद्यांना जेवण पुरविले म्हणून एडका मासा आत्राम या आदिवासी तरुणाला पोलिसांनी घरून उचलून नेले. त्याला बेदम मारहाण केल्यामुळे एडकाचा मृत्यू झाला. त्यामुळे आपले पाप लपविण्यासाठी दोषी पोलिसांनी तो (एडका) नक्षलवादी असल्याचा कांगावा केला. एडकाला नक्षलवादी संबोधून त्याचा मृत्यू झाल्याची मखलाशी गडचिरोलीचे तत्कालीन पोलीस अधिकारी करीत असतानाचा वृत्तपत्रांनी या प्रकरणातील वास्तव प्रकाशित करून पोलिसांच्या पापाची लक्तरे वेशिवर टांगली होती. त्यावेळी हे प्रकरण देशभर गाजले आणि प्रचंड दबाव निर्माण झाल्यामुळे एडकाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या पोलिसांवर गुन्हे दाखल झाले. त्यात डेकाटेचाही समावेश होता. न्यायालयाने त्याला १ डिसेंबर २०११ रोजी दोषी ठरवून शिक्षा सुनावली. बडतर्फी अन् सेवाबहाली न्यायालयाने शिक्षा सुनावल्यामुळे पोलीस खात्यानेही डेकाटेला पोमसं/ ११अ/२२/७/२२७/२०११ च्या दि. २०आॅगस्ट २०१३ च्या अंतिम आदेशान्वये पोलीस खात्यातून बडतर्फ केले. यावेळी डेकाटे नागपूर ग्रामीणमध्ये कार्यरत होता. या बडतर्फीविरुद्ध डेकाटेने अपील केले. २४ फेब्रुवारी २०१४ च्या पत्रान्वये पोलीस महासंचालनालयातर्फे त्याचा अर्ज शासनाकडे पाठविण्यात आला. पुढे झालेल्या हालचालीनंतर डेकाटेवर मेहरबान झालेल्या यंत्रणेने त्याला पोलीस दलात पुन्हा रुजू करून घेतले. दरम्यान त्याचे पीएसआय ते एपीआय प्रमोशनही झाले होते. २२ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्यामुळे एडकाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांच्या घडामोडीकडे कुणाचे फारसे लक्ष गेले नाही.