शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
2
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
3
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
4
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
5
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
6
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
7
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
8
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
9
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
10
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
11
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
12
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
13
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
15
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
16
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
17
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
18
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
19
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
20
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन बस प्रवाशांच्या सेवेत

By admin | Updated: November 18, 2014 00:50 IST

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार डिझेलला पर्याय व पर्यावरणपूरक अशा इथेनॉलवर धावणारी ग्रीन बस सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झ्राली. संविधान चौक (रिझर्व्ह बँक चौक) येथे आयोजित

महापौरांनी दाखविली हिरवी झेंडीनागपूर : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार डिझेलला पर्याय व पर्यावरणपूरक अशा इथेनॉलवर धावणारी ग्रीन बस सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झ्राली. संविधान चौक (रिझर्व्ह बँक चौक) येथे आयोजित कार्यक्रमात महापौर प्रवीण दटके यांनी फित कापून व हिरवी झेंडी दाखवून पहिल्या फेरीसाठी ही बस रवाना केली; यासोबतच शहर बससेवेच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसावा, या हेतूने स्कॅनिया कंपनीच्या सहकार्याने दोन महिन्यापूर्वी महापालिकेला प्रायोगिक तत्त्वावर ग्रीन बस उपलब्ध झाली होती. परंतु नियमानुसार प्रवासी वाहतुकीसाठी प्रादेशिक परिवहन खात्यासह अन्य विभागाच्या परवानगी असल्याने ही बस प्रवाशांच्या सेवेत आली नव्हती. सर्वप्रकारच्या परवानगी प्राप्त झाल्याने आता ही बस प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. ही बस सुरू होताच उपस्थितांनी आनंद व्यक्त क रून शहराचे पर्यावरण राखण्याला मदत होईल, अशी भावना व्यक्त केली. यावेळी मनपाच्या परिवहन समितीचे सभापती बंडू राऊ त, नासुप्रचे विश्वस्त डॉ. रवीद्र्र भोयर, आरोग्य सभापती रमेश सिंगारे, गांधीबाग झोनचे सभापती रमेश पुणेकर, बसपाचे पक्षनेते मुरलीधर मेश्राम, नगरसेवक सतीश होले, शरद बांते, मनीषा कोठे, सारिका नांदूरकर, प्रकाश तोतवानी, परिवहन व्यवस्थापक व उपायुक्त संजय काकडे, स्कॅनिया कंपनीचे विश्वजित कुमार, चंद्रभान उदास, परिवहन विभागाचे वाहतूक व्यवस्थापक सुकीर सोनटक्के, विजय चौरसिया, ग्रीन व्हिजल फाऊं डेशनचे कौस्तुब चटर्जी, सुरभी जैस्वाल आदी उपस्थित होते.पहिला आठवडा ही बस प्रायोगिक तत्त्वावर धावणार आहे. एम.एच.३१-डी.एस.६३३७ क्रमांकाची ही वातानुकूलित ग्रीन बस संविधान चौक ते खापरीदरम्यान दोन पाळ्यात धावणार आहे. ही बस सकाळी ८ व दुपारी ६ अशा १४ फेऱ्या दररोज करणार आहे. या बसला १० थांबे राहतील. यात संविधान चौक, व्हेरायटी चौक, पंचशील चौक, रहाटे कॉलनी, छत्रपती चौक, सोमलवाडा, विमानतळ ,चिंचभवन व खापरी आदींचा समावेश आहे. बसचे भाडे पहिल्या २ ते ४ कि.मी.अंतरासाठी १० रुपये, (लहान मुलांसाठी ५ रुपये),६ कि.मी.ला ११, ८ कि.मी.साठी १३ रुपये, १० कि.मी.साठी १५ रुपये, १२ कि.मी.साठी १८ कि.मी.ला २१ तर १६ कि.मी. अंतरासाठी २५ रुपये (लहान मुलांना १३ रुपये) या प्रमाणे राहणार आहे. (प्रतिनिधी)