Exclusive : नशेच्या गोळ्या घेऊन केले जातात हत्येसारखे गंभीर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:09 AM2021-09-26T04:09:03+5:302021-09-26T04:09:03+5:30

पोलिसांच्या थर्ड डिग्रीपुढे मोठ्यात मोठा अन् खतरनाक गुन्हेगार नतमस्तक होतो. तो मागच्या पुढच्या सर्वच गुन्ह्यांची जंत्री वाचतो.

Serious crimes like murder are committed by taking drugs | Exclusive : नशेच्या गोळ्या घेऊन केले जातात हत्येसारखे गंभीर गुन्हे

Exclusive : नशेच्या गोळ्या घेऊन केले जातात हत्येसारखे गंभीर गुन्हे

Next
ठळक मुद्देपोलिसांच्या थर्ड डिग्रीपुढे मोठ्यात मोठा अन् खतरनाक गुन्हेगार नतमस्तक होतो. तो मागच्या पुढच्या सर्वच गुन्ह्यांची जंत्री वाचतो.

नरेश डोंगरे 

नागपूर : पोलिसांच्या थर्ड डिग्रीपुढे मोठ्यात मोठा अन् खतरनाक गुन्हेगार नतमस्तक होतो. तो मागच्या पुढच्या सर्वच गुन्ह्यांची जंत्री वाचतो. अगदी पोपटासारखा पटापट बोलतो. मात्र, गेल्या वर्षभरात घडलेल्या अनेक गंभीर गुन्ह्यातील अनेक नवखे आरोपी पोलिसांच्या थर्ड डिग्रीला जुमानलेच नाहीत. बाजीरावलाही त्यांचा थंड प्रतिसाद होता. पडद्यामागचे अनेक सूत्रधार पोलिसांच्या कारवाईपासून दूर ठेवण्यासाठी खतरनाक गुन्हेगारांनी शोधलेल्या क्लृप्तीची ही सर्व कमाल आहे. ती कमाल दाखवतात नशेच्या गोळ्या।

नायट्रो-१० (गुन्हेगारांच्या भाषेत डी, दो-टेन) आणि अशाच दुसऱ्या दोन गोळ्या घेतल्या की दोन बंपर दारू प्यावी, अशा मोडमध्ये (नशेत) संबंधित व्यक्ती जातो. त्यामुळे त्याने काय केले, कसे केले, कुणाच्या सांगण्यावरून केले, ते दोन-चार दिवस त्याच्या लक्षातच राहत नाही. त्यामुळे पोलिसांकडून त्याला थर्ड डिग्रीच काय कोणतीही डिग्री दिली तरी त्याचा थंड प्रतिसाद असतो. अनेक गुन्ह्यांच्या तपासातूनही हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

गेल्यावर्षी २६ सप्टेंबरला बाल्या बिनेकरची भर रस्त्यावर सिनेस्टाईल हत्या झाली. या हत्याकांडाचा व्हिडिओ सिनेमाच्या ट्रेलरसारखा देशभर व्हायरल झाला. पोलिसांनी आरोपींना अटक केली तेव्हा ते नशेत टुन्न होते. नशा एवढी की त्यांना काही बोलताही येत नव्हते. देवा उसरे आणि त्यानंतर डझनभरापेक्षा जास्त गुंडांच्या हत्येत, छोटा इब्राहिम आणि या आठवड्यात झालेल्या गमछूच्या हत्याकांडातील आरोपींचीही अशीच अवस्था होती. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांचा पीसीआर घेतला. मात्र, पहिल्या तीन ते चार दिवसांत थर्ड डिग्री देऊनही त्यांच्यातील अनेक गुन्हेगार काही सांगायला, बोलायला तयार नव्हते. पोलिसांनी नंतरच्या वाढीव पीसीआरमध्ये (नशा उतरल्यानंतर) त्यांना बोलते केले अन् पडद्यामागच्या गुन्हेगारांनी, सुपारी देणाऱ्यांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी एक नवीन क्लृप्ती योजल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. गुन्हेगारांचे हे नवे तंत्र म्हणजे, प्रचंड नशा निर्माण करणाऱ्या नायट्रो आणि अशाच प्रकारच्या गोळ्यांचे सेवन होय.

दहापट किंमत घेऊन छुपी विक्री

या गोळ्यांची होत असलेली सर्रास विक्री अन् त्यातून काही मेडिकल स्टोअर्सवाल्यांची झालेली चाैकशी विक्री आणि उपलब्धतेला आळा घालणारी ठरली. गोळ्यांची किंमत कमी असली तरी रुग्णांऐवजी गुन्हेगारांकडूनच त्याची मागणी जास्त असल्याचे लक्षात आल्यामुळे शहरातील काही ठराविक औषध विक्रेतेच त्या दहापट किंमत घेऊन छुप्या मार्गाने विकतात. शहरातील उत्तर नागपूरसह काही विशिष्ट भागातच या गोळ्या मिळतात.

काय होतात परिणाम

  • अल्प किमतीत मिळणाऱ्या या गोळ्या औषध म्हणून दिल्या जातात. संबंधित सूत्रांनुसार, वेदनेची तीव्रता कमी व्हावी. कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करता यावा, यासाठी या गोळ्यांचा रुग्णांसाठी थोडक्या प्रमाणात वापर केला जायचा.
  • विशेष म्हणजे, या गोळ्यांचा डोस निद्रा (झोप) दूर ठेवतो. अफू (काला माल) पेक्षा खूप कमी किमतीत त्या मिळत असल्याने त्यामुळे लांब पल्ल्याची वाहतूक करणारे ट्रक ड्रायव्हर या गोळ्यांचा वापर करू लागले.
  • आता गुन्हेगारांनी आपल्या पाठीराख्यांना, सुपारी देणाऱ्यांना, भाईंना पोलिसांच्या कारवाईपासून दूर ठेवण्यासाठी या गोळ्यांचा वापर सुरू केला आहे.

Web Title: Serious crimes like murder are committed by taking drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app