शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

घरातूनच वेगळा करा ओला आणि सुका कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 8:27 PM

२० नोव्हेंबरनंतर नागरिकांनी स्वत:हून ओला आणि सुका कचरा विलग करुनच संबंधित स्वच्छतादूताकडे द्यावा, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी केले. तसेच त्यांनी यासंदर्भात संबंधित यंत्रणेला निर्देश दिले.

ठळक मुद्देनागपूर मनपा आयुक्त अभिजित बांगर यांचे आवाहन : दररोज आढावा घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरातील कचरा संकलन करणाऱ्या कनक रिसोर्सेस कंपनीचे कंत्राट संपुष्टात आले आहे.महापालिकेने नवीन दोन कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. या कंपन्यांनी शनिवारपासून कचरा संकलनाच्या कामाला सुरूवात केली आहे. नागरिकांच्या घरातील कचरा वर्गीकृत करूनच घेणार आहे. सुरुवातीला याबाबत नागरिकांना जागरुक करण्यात येणार आहे. २० नोव्हेंबरनंतर नागरिकांनी स्वत:हून ओला आणि सुका कचरा विलग करुनच संबंधित स्वच्छतादूताकडे द्यावा, असे आवाहन महापालिकेचे आयुक्तअभिजित बांगर यांनी केले. तसेच त्यांनी यासंदर्भात संबंधित यंत्रणेला निर्देश दिले.महापालिका मुख्यालयातील सभागृहात शनिवारी नवीन कंपन्यांच्या कामासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत आयुक्त बोलत होते. यावेळी सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.सुनील कांबळे, स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार आदी उपस्थित होते.आयुक्त म्हणाले, यंत्रणा ही नवीन असल्याने सुरुवातीला काम करायला थोडा त्रास जाईल. काही सजग नागरिक कचरा विलग करून देतील. परंतु सर्वच नागरिक कचरा विलग करून देणार नाहीत. याबाबत यंत्रणेमार्फत नागरिकांना जागृत करणे आवश्यक आहे. २० तारखेपर्यंत नागरिकांना याबाबत अवगत करावे. २० तारखेनंतर कुठल्याही घरातून कचरा एकत्रित घेऊ नका, असे निर्देश आयुक्तांनी कचरा संकलन करणाऱ्या यंत्रणेला दिले आहेत. जोपर्यंत यंत्रणा सुरळीत कार्य करीत नाही, तोपर्यंत दररोज आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.प्रारंभी यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. यामध्ये त्यांना काही त्रुटी आढळून आल्याचे दिसून आले. त्या तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश आयुक्तांनी यंत्रणेला दिले.वीरेंद्र कुकरेजा यांनी यावेळी नवीन यंत्रणेमार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती सांगितली. आतापर्यंत शहरात १७० कचरा संकलन केंद्र होते. आता नवीन यंत्रणेच्या कार्यपद्धतीनुसार फक्त २५ ट्रांन्सफर युनिट असणार आहेत. यामध्ये गाडीतून कचरा मोठ्या गाडीत टाकल्या जाणार आहे. तेथूनच तो कचरा प्रक्रिया केंद्रावर पाठविला जाणार आहे. कचऱ्याचा पुरेपूर उपयोग करून त्यावर प्रक्रिया करणार असल्याची माहिती कुकरेजा यांनी दिली.जुन्या कर्मचाऱ्यांना समावून घेणारयावेळी जुन्या कचरा संकलन यंत्रणा कनक रिसोर्सेच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न मांडला. यावर बोलताना आयुक्त यांनी कनकच्या सर्व कर्मचाऱ्यांना नवीन यंत्रणेमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे, अशी अट निविदेमध्ये समाविष्ट केली असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.कचरा वर्गीकृत करूनच द्याआपले शहर स्वच्छ व सुंदर दिसावे यासाठी महानगरपालिका प्रयत्नरत आहे. नागरिकांनी मनपाच्या प्रयत्नांना सहकार्य करणे आवश्यक आहे. नागरिकांनी आपल्या घरातील कचरा हा ओला सुका वर्गीकृत करून द्यावा, असे आवाहन अभिजित बांगर यांनी केले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाAbhijit Bangarअभिजित बांगरcommissionerआयुक्तGarbage Disposal Issueकचरा प्रश्न