शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

सेनेत संघटनात्मक फेरबदल

By admin | Updated: February 20, 2015 02:25 IST

शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल केले असून पूर्व विदर्भाचे संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे डॉ. दीपक सावंत यांच्यावरील संघटनात्मक कामाचा भार हलका करण्यात आला आहे. त्

नागपूर : शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल केले असून पूर्व विदर्भाचे संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे डॉ. दीपक सावंत यांच्यावरील संघटनात्मक कामाचा भार हलका करण्यात आला आहे. त्यांच्याकडे फक्त नागपूर शहर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांची भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून तर किशोर कन्हेरे यांची गडचिरोली व नागपूरचे सहसंपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.राज्यात सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिवसेनेने पक्षबांधणीवर लक्ष केंद्रीत केले असून त्यासाठी शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सेनेच्या मंत्र्यांनी जिल्हावार दौरे केले. त्यानंतरच्या टप्प्यात संपर्क व सहसंपर्क प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. नवीन नियुक्त्या करताना मंत्रिपद सांभाळणारे डॉ. दीपक सावंत यांच्यावरील संघटनात्मक कामाचा भार हलका करण्यात आला आहे. त्यांच्याकडे पूर्वी पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांची जबाबदारी होती. आता त्यांच्याकडे फक्त नागपूर शहर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली. उर्वरित चार जिल्ह्यांपैकी भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांची जबाबदारी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्याकडे तर चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याची जबाबदारी हिंगणघाटचे माजी आमदार अशोक शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली. गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी नागपूरचे किशोर कन्हेरे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांच्याकडे नागपूर शहर सहसंपर्क प्रमुख पदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. कन्हेरे विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले होते. त्यांना आता शहर सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्त करण्यात आली. पुढील दोन वर्षात नागपूरमध्ये महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर कन्हेरे यांना देण्यात आलेली नवीन जबाबदारी महत्त्वाची ठरते. गुरुवारी त्यांनी डॉ. दीपक सावंत यांची रविभवन येथे भेट घेतली. (प्रतिनिधी)