शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅग्रो व्हिजनने जागविला शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास

By admin | Updated: December 15, 2015 05:22 IST

शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास जागविण्याचे काम अ‍ॅग्रो व्हिजनने केले आहे. या प्रदर्शनाला भेट देऊन शेतकऱ्यांनी ज्ञान

नागपूर : शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास जागविण्याचे काम अ‍ॅग्रो व्हिजनने केले आहे. या प्रदर्शनाला भेट देऊन शेतकऱ्यांनी ज्ञान मिळविले. या ज्ञानाच्या उपयोगातून त्यांनी यशस्वी शेतकरी व्हावे. केवळ परंपरागत शेतीने आता काम चालणार नाही. नवीन तंत्रज्ञान आणि पीक पद्धतीत बदल केल्याशिवाय सध्या पर्याय नाही. त्याचा फायदाही शेतकऱ्यांना अनुभवता येईल, असा मंत्र कृषी प्रदर्शन अ‍ॅग्रो व्हिजनचे प्रवर्तक आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना दिला. रेशीमबाग मैदानावर आयोजित चार दिवसीय कृषी प्रदर्शन अ‍ॅग्रो व्हिजनचा समारोप करताना ते बोलत होेते. याप्रसंगी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, माजी खा. दत्ता मेघे, आ. मिलिंद माने, आ. अनिल गोटे, आ. भीमराव घोंडे, आ. किशनराव कथोरे, आयोजक सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर प्रामुख्याने उपस्थित होते. गडकरी म्हणाले, ग्लोबल आणि लिब्रल इकॉनॉमीत शेतकऱ्यांच्या उत्पादनांना जास्त भाव मिळणे कठीण आहे. कुठलेही सरकार असले तरी ते शेतकऱ्यांना अधिक मूल्य देऊ शकत नाही. शेतकऱ्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. यामुळे उत्पादन खर्च कमी होईल. केवळ सरकार किंवा एखादी योजना शेतकऱ्यांची मदत करू शकत नाही. शेतकऱ्यांना स्वत:च्या भरवशावरच सक्षम व्हावे लागेल. ज्या वर्षी एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, त्या दिवशी मला आनंद आणि समाधान मिळेल. त्यावेळी खऱ्या अर्थाने शेतकरी आत्मनिर्भर झाला असे मी समजील. त्यावेळी अ‍ॅग्रो व्हिजनची गरज पडणार नाही. ज्ञानाला संपत्तीत परिवर्तन करण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाच्या उपयोगातून कृषी क्षेत्रात रोजगाराची निर्मिती होणार आहे. पण त्यासाठी शेतीशिवाय पूरक उद्योगांवरही लक्ष द्यावे लागेल. मत्स्यपालन, डेअरी, पोल्ट्री उद्योग, मधमाशापालन आदी उद्योगवाढ करावी लागेल. याप्रसंगी नागार्जुन कंपनीतर्फे गडकरींनी दत्तक घेतलेल्या पाचगावसाठी ‘सॉईल टेस्टिंग युनिट’ त्यांना प्रदान करण्यात आले. अतिथींचा सत्कार संत्री देऊन करण्यात आला. या प्रदर्शनाला पाच लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भेट दिली. त्यांच्यासाठी गाड्या पाठविण्यात आल्या नाही. पण शेतकऱ्यांनी पुढाकार घेत प्रदर्शनाला भेट दिली, अशी माहिती गडकरी यांनी दिली. (प्रतिनिधी)‘अ‍ॅग्रो व्हिजन’ राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचा समारोप सोमवारी रेशीमबाग मैदानावर झाला. याप्रसंगी अ‍ॅग्रो व्हिजनचे प्रवर्तक आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार डॉ. मिलिंद माने, अनिल गोटे, किशन कथोरे, भीमराव घोंडे, ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, जि.प.च्या अध्यक्षा निशा सावरकर, अ‍ॅग्रो व्हिजनच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी, संयोजक सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर, माजी आमदार दादाराव केचे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.