शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

चार वर्षात विदर्भाच्या बाजारपेठेत दिसणार सीडलेस संत्रा-मोसंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 10:30 IST

Oranges, Vidarbha, Oranges नागपुरातील केद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने संत्र्याच्या दोन आणि मोसंबीच्या चार अशा सहा नव्या प्रजाती विकसित केल्या आहेत. विशेष म्हणजे त्या सीडलेस आहेत.

ठळक मुद्देकेद्रीय लिंबूवर्गीय फळसंशोधन संस्थेचा दावा संत्र्याच्या दोन आणि मोसंबीच्या चार नव्या प्रजाती विकसित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील केद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने संत्र्याच्या दोन आणि मोसंबीच्या चार अशा सहा नव्या प्रजाती विकसित केल्या आहेत. विशेष म्हणजे त्या सीडलेस आहेत. येत्या चार ते पाच वर्षात विदर्भातील बाजारपेठेत ही फळे दिसणार असून ही अधिक उत्पन्नाची हमी असलेली ही नवी क्रांती ठरेल, असा विश्वास संस्थेचे संचालक डॉ. एम.एस. लदानिया यांनी व्यक्त केला आहे.

मागील पाच ते सहा वर्षापासून संस्थेच्या फार्मवर या प्रजातींचे रोपण करून त्यांचे संशोधन सुरू होते. यंदा चार ते पाच वर्षानंतर या सहाही प्रजातींना फळे आली आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. लदानिया यांनी हा दावा केला. पुढील वर्षापासून या सहाही प्रजातींच्या कलमा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या सर्व अर्ली व्हेरायटी असून कमी जागेत आणि कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणाऱ्या आहेत. त्यामुळे या नवीन प्रजाती शेतकऱ्यांसाठी यशदायी आणि अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या ठरतील, असे ते म्हणाले.

ब्लड रेड माल्टा आणि जाफा या दोन प्रजातीसह ब्राझीलवरून आणलेल्या व येथील वातावरणात विकसित केलेल्या वेस्टीन आणि हमलिन या चार प्रजाती मोसंबीच्या प्रकारातील आहेत. तर, पर्ल टँजेलो आणि डेझी या संत्र्यांच्या दोन जाती आहेत. या दोन्ही प्रजाती युएसए येथील असून त्या विदर्भातील वातावरणात विकसित केल्या आहेत.जाफा ही मोसंबी इस्त्रायल प्रजातीची असून विदर्भातील वातावरणात प्रति हेक्टरी २० टन उत्पादन घेता येऊ शकते, असा संशोधन संस्थेचा दावा आहे. तर, इटली व स्पेन येथील असलेली ब्लड रेड माल्टाचे उत्पादन प्रति हेक्टरी २५ ते ३० टन घेता येइल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे. या दोन्ही प्रजाती रसदार असून ज्यूस निर्मितीसाठी उत्तम ठरणाºऱ्या आहेत. वेस्टीन आणि हमलिन या ब्राझीलवरून आणलेल्या प्रजाती रसाळ, मोठ्या आकाराच्या आणि चवीला संत्र्यासारख्या आहेत. निर्यातयोग्य असणाऱ्या आणि अधिक उत्पन्नाची हमी असणाऱ्या या प्रजाती असल्याचे डॉ. लदानिया यांनी सांगितले.पर्ल टँजेलो ठरू शकतो नागपुरी संत्र्याला पर्यायपर्ल टँजेलो ही संत्रा व्हेरायटी असली तरी त्या मोसंबीसारखी दिसते. विशेष म्हणजे, कमी आम्लतेचे व चवीला गोड असणारे हे फळ आहे. नागपुरी संत्र्याला पर्याय ठरू शकणारी ही व्हेरायटी असून पाचव्या वर्षी उत्पन्न मिळते. प्रति हेक्टर १२ ते १३ टन उत्पन्नाचा दावा संशोधन संस्थेने केला आहे. डेझी ही सद्धा मोसंबीसारखी दिसणारी प्रजाती असून दोन संत्रा प्रजातीमध्ये क्रॉस करून विकसित केली आहे. तिचे सुद्धा हेक्टरी उत्पादन तेवढेच सांगितले जात आहे.मागील पाच वर्षातील संशोधनातून या प्रजाती विकसित केल्या आहेत. विदर्भाच्या वातावरणात सहजपणे रुजणाºया असून अधिक उत्पन्नाची हमी देणाऱ्या आहेत. पुढील वर्षापासून त्याच्या कलमा उपलब्ध केल्या जातील. लिंबूवर्गीय उत्पदकांसाठी ही नवी क्रांती ठरेल._ डॉ. एम.एस. लदानिया, संचालक, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था

 

टॅग्स :fruitsफळे