कॅटरिनाची एक अदा पाहण्यासाठी नागपूरकरांची एकच गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 21:38 IST2018-07-21T20:59:40+5:302018-07-21T21:38:19+5:30
हल्ली बॉलीवूडमध्ये आपल्या अदांनी गाजत असलेली चित्रपट अभिनेत्री कॅटरिना कैफ हिला पाहण्यासाठी नागपूरकरांनी एकच गर्दी केली होती.

कॅटरिनाची एक अदा पाहण्यासाठी नागपूरकरांची एकच गर्दी
नागपूर : हल्ली बॉलीवूडमध्ये आपल्या अदांनी गाजत असलेली चित्रपट अभिनेत्री कॅटरिना कैफ हिला पाहण्यासाठी नागपूरकरांनी एकच गर्दी केली होती.
कॅटरिना ही एका ज्वेलरी शोरूमच्या उद्घाटनासाठी आली होती. ती बाऊंसरच्या गराड्यात होती. तिला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. उल्लेखनीय म्हणजे कॅटरिना हिने प्रथमच जाहीर कार्यक्रमात उपस्थिती लावली आहे. प्रेक्षकांशी संवाद साधताना कॅटरिना कैफ हिने उद्घाटन केलेल्या ज्वेलरी ब्रॅण्डशी आपण कसे जुळलो आहोत, हे सांगितले.
या ज्वेलरीची ब्रॅण्ड अॅम्बेसडर म्हणून कॅटरिना कैफ हिने या वर्षाच्या सुरुवातीलाच करार केला आहे. ज्वेलरी आणि विविध कलेक्शन आपल्याला पसंत असल्याचेही तिने सांगितले. कॅटरिना ही इंदूर येथील एका आऊटलेटचे उद्घाटन करून नागपुरात आली. रायपूर येथील अन्य एका शोरूमचेही ती उद्घाटन करणार आहे.