शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाची सुरक्षा धोक्यात

By admin | Updated: January 6, 2016 03:39 IST

उपराजधानीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षासंबंधीच्या त्रुटी नेहमीच चर्चेचा विषय राहिल्या आहेत.

कार्गो स्कॅनिंग मशीन बंद : पार्सल अडले ; प्रशासन घेणार का दखल ?नागपूर : उपराजधानीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षासंबंधीच्या त्रुटी नेहमीच चर्चेचा विषय राहिल्या आहेत. सध्या येथील कार्गो स्कॅनिंग मशीन बंद पडल्याने पुन्हा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.विमानातून पाठविण्यात येणाऱ्या कार्गो व पार्सलच्या तपासणीत अडचणी येत आहे. येथे लावण्यात आलेल्या दोन्ही कार्गो स्कॅनिंग मशीन ठप्प झाल्या आहेत. विशेष म्हणजे, पठाणकोट एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील सर्व विमानतळावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षेकडे डोळेझाक कशासाठी?नागपूर : नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा सुद्धा समावेश आहे. शिवाय नागपूर विमानतळ हे देशातील संवेदनशील विमानतळापैकी एक आहे. असे असताना येथील सुरक्षेकडे डोळेझाक केली जात आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी देशात पार्सल बॉम्बच्या माध्यमातून घातपात झाला आहे. तरी सुद्धा येथील सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे. अधिक शुल्क वसुली सध्या विमानतळावर मशीनऐवजी साधी (मॅन्युअल) तपासणी केली जात आहे. परंतु त्यासाठी अतिरिक्त शुल्क वसूल केले जात आहे. माहिती सूत्रानुसार मशीनद्वारे करण्यात येणाऱ्या कार्गो स्कॅनिंगसाठी ६०० रुपये शुल्क आकारल्या जात होते. परंतु सध्या ते २४०० रु. घेतले जात आहे. शिवाय मॅन्युअल तपासणीत पैसा व वेळ दोन्हीचा अपव्यय होत आहे. मॅन्युअल तपासणीनंतर पुन्हा पॅकिंग करावी लागते. त्यासाठी सुद्धा अतिरिक्त वेळ लागतो. खासगी व एअर इंडियाच्या मशीन बंद असताना एमआयएलच्या मशीनद्वारे तपासणी केली जात आहे. परंतु त्यासाठी एमआयएलसुद्धा चौपट शुल्क वसूली करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. एअर इंडियाच्या मशीनवर अतिरिक्त भारएका खासगी एअरलाईन्सच्या मशीनमध्ये बिघाड झाल्यानंतर त्या कंपनीने एअर इंडियाच्या मशीनची मदत घेतली. त्यामुळे एअर इंडियाच्या मशीनवर अतिरिक्त भार पडला असून, आता ती सुद्धा बंद पडली आहे. माहिती सूत्रानुसार एअर इंडियाची कार्गो स्कॅनिंग मशीन फार जुनी आहे. त्यामुळे येथे नवीन मशीनची गरज आहे. विशेष म्हणजे, वर्षभरापूर्वी येथील कार्गो कार्यालयात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. त्यानंतर येथील वायरिंगच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. तसेच राष्ट्रपतींच्या विमानामुळे डुक्कर आल्यानंतर येथील जनावरे बाहेर काढण्यासाठी कवायत करण्यात आली. यावरू न एखादी घटना घडल्यानंतरच येथील प्रशासन जागे होत असल्याचा अनुभव आहे. खासगी एअरलाईन्सची मशीन फेल! येथील एका खासगी एअरलाईन्सची कार्गो स्कॅनिंग मशीन केवळ शोभेची वस्तू बनली आहे. माहिती सूत्रानुसार ती मशीन कम्बाईन्ड टेस्ट पीस (सीटीपी) मध्ये फेल ठरली आहे. त्यामुळे तिला परवानगी नाकारण्यात आली आहे. असे असताना विमानतळ प्रशासन संबंधित एअरलाईन्सला दुसरी मशीन लावण्याचे निर्देश का देत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)