शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
2
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
3
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
4
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
7
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
8
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
9
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
10
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
11
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
12
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
13
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
14
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
15
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
16
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
17
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
18
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
19
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
Daily Top 2Weekly Top 5

मनाला स्पर्श करणारे ‘ऋतुस्पर्श’

By admin | Updated: November 26, 2014 01:06 IST

अखिल भारतीय मराठी नाट्य स्पर्धेतील काव्यात्मक व भावनात्मक अनुभूतीचे नाटक ‘ऋतुस्पर्श’ रसिकांची पसंती मिळवून गेले. आपल्या दैनंदिन जगण्याशी निकटतेने जुळलेल्या सहा ऋतूंच्या निकट

नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य स्पर्धेतील काव्यात्मक व भावनात्मक अनुभूतीचे नाटक ‘ऋतुस्पर्श’ रसिकांची पसंती मिळवून गेले. आपल्या दैनंदिन जगण्याशी निकटतेने जुळलेल्या सहा ऋतूंच्या निकट अनुबंधाचा वेध घेणारे हे नाटक नितीन नायगावकर या नवोदित नाटककाराच्या कुशल लेखन प्रतिभेचा परिचय देणारे होते. हे नाटक श्याम पेठकर लिखित ‘ऋतुस्पर्श’ या ललितबंधावर आधारित होते. लेखक, दिग्दर्शक व सहभागी कलाकारांनी दर्शकांना पहिल्या प्रयत्नातच जिंकले.
मानवी जीवनात अविरतपणे फिरणाऱ्या ऋतुचक्राचे रंगरूप व गंध वेगळाच. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अल्लड बालपण, नवथर यौवन, भावुक तारुण्य आणि उत्तरार्धातील आश्वस्त प्रौढत्व व्यक्तिनुरूप विविध अनुभवांचे असते. मात्र जगण्याच्या प्रत्येक वळणावर कितीही खाचखळगे आले, अडचणी आल्या तरी शेवटच्या श्वासापर्यंत आपली ओंजळ सुगंधी फुलांनी भरलेली राहण्यासाठी या जगण्यावर, अवतीभवतीच्या माणसांवर, निसर्गातल्या पानाफुलांवर, पक्ष्यांवर मनापासून प्रेम करायला हवे.
गावाकडच्या उन्मुक्त वातावरणातील व बंदिस्त शहरातील ऊन-पाऊस-थंडीची अनुभूती नक्कीच वेगळी असते. ज्या शहरात बदलत्या ऋतूंची चाहूल जाणवत नाही, त्या शहरांना खरंतर आभाळच नसते. अन् ज्या तरुण-तरुणींच्या जीवनात प्रीतीची अनिवारता, स्थिरता असते, त्यांच्या जीवनात प्रत्येक ऋतूचे आगमन म्हणजे जणू नवसृजनाचा आनंदोत्सवच असतो. दैनंदिन जीवनातील अशा विविधांगी प्रसंग मालिकांना काव्यात्मक शैलीच्या संवादासह सादर करणारे सूत्रधार विनोद तुंबडे, दिनेश चंदनकर, रेणुका चुटके, मधू जोशी, श्रद्धा तेलंग, निधी चरपे, नमिता माने, ओंकार मुळे, आकाश डोंगरे, हर्षल तामणे, वासंती म्हेत्रे या कलाकारांचे हे सकस सादरीकरण होते.
दिग्दर्शन मीनल इथापे, सहदिग्दर्शन कल्याणी उपाध्ये, संगीत भय्या पेठकर तर निर्मिती समीर पंडित यांचे होते.(प्रतिनिधी)