शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

सामान्यांच्या खिशाला कात्री

By admin | Updated: March 1, 2015 02:21 IST

मध्यमवर्गीयांना कोणताही थेट फायदा न देता सेवाकर १२.३६ वरून १४ टक्क्यांवर नेण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.

नागपूर : मध्यमवर्गीयांना कोणताही थेट फायदा न देता सेवाकर १२.३६ वरून १४ टक्क्यांवर नेण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. त्याचा थेट परिणाम महागाईवर होणार असून घरे व औषधांपासून सर्व प्रकारची महागाई वाढणार आहे. आधीच कराचा भार सोसणाऱ्या नागपूरकरांनी सेवाकरांच्या वाढीवर नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येक सेवा कराच्या टप्प्यात आल्याने जीवनशैली महागडी होणार आहे. त्यात गरीब व सामान्य भरडला जात आहे. ११८ सेवांवर करदोन ते चार सेवांनी सुरू झालेला सेवाकर आता जवळपास ११८ सेवांवर आकारला जातो. देशातील प्रत्येक सेवा कराच्या टप्प्यात आली आहे. मोबाईलचे रिचार्ज असो वा हॉटेलचे बिल सर्व काही या टप्प्यात आहे. प्रत्येक क्षणी नागरिक कर देतो. १ एप्रिलपासून १४ टक्के करआकारणी होणार आहे. मोबाईल रिचार्ज, के्रडिट कार्ड, डेबिट कार्ड. फॅशन डिझायनर्स, इंटेरिअर डेकोरेटर, हेल्थ क्लब, फिटनेस सेंट, हॉटेल, क्लब हाऊस, गेस्ट हाउस, रेस्टॉरेंट सेवा, ट्रॅव्हल्स एजंट, केबल आॅपरेटर्स, सौंदर्य सेवा, कॅटरिंग, फोटोग्रॉफी, टूर आॅपरेटर, कॅब, रेल्वे ट्रॅव्हल्स एजंट सर्वकाही महाग होणार आहे. हे सर्व करीत असताना अ‍ॅम्ब्युलन्स सेवांना वगळले आहे. आता म्युझियम, नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सेंक्चुरी, टायगर रिझर्व्ह आदींमध्ये प्रवेश आदींना सेवेतून वगळले आहे. फळ-भाज्यांची प्री-कोल्ड स्टोरेज सेवा, निर्यातीसाठी रस्ता मार्गाने कस्टम स्टेशनपर्यंत मालाचे परिवहन, सीईटीपी आॅपरेटर, एलआयसी वरिष्ठ पेन्शन विमा योजनेसंबंधी सेवांना कर लागणार नाही. पेट्रोल-डिझेल दरवाढीने महागाई वाढणारमहागाईने आधीच बेजार असलेल्या नागपूरकरांना पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा फटका बसला आहे. दर महिन्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमतीनुसार नागपुरात शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर वधारून अनुक्रमे ६९.७९ आणि डिझेल ५८.५९ रुपयांवर पोहोचले आहेत. याआधी रेल्वे बजेटमध्येही सिमेंट, कोळसा, धान्य, डाळ, युरिया, खाद्य तेल, एलपीजी, केरोसिन आदींच्या वाहतुकीत वाढ झाली आहे.