शाळा, शासकीय कार्यालय बनले दारूचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST2021-06-24T04:07:33+5:302021-06-24T04:07:33+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : नजीकच्या लाेणखैरी गावात शासकीय कार्यालय इमारती, पटांगण तसेच शाळेच्या इमारती दारूचे अड्डे बनले असून, ...

Schools, government offices became liquor dens | शाळा, शासकीय कार्यालय बनले दारूचा अड्डा

शाळा, शासकीय कार्यालय बनले दारूचा अड्डा

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेराडी : नजीकच्या लाेणखैरी गावात शासकीय कार्यालय इमारती, पटांगण तसेच शाळेच्या इमारती दारूचे अड्डे बनले असून, या गावात सर्रासपणे अवैध दारू विक्री केली जात आहे. याबाबत पाेलिसांना वारंवार सूचना देऊनही याेग्य कारवाई हाेत नसल्याने अवैध धंदे जाेरात सुरू आहे. त्यामुळे ही दारू विक्री तात्काळ बंद करा, अन्यथा पाेलीस ठाण्यासमाेर उपाेषण करू, असा इशारा लाेणखैरीचे उपसरपंच बाेधीसत्व झाेडापे यांनी खापरखेडा पाेलिसांना निवेदनाद्वारे दिला आहे.

लाेणखैरी गावातील अवैध धंद्यांबाबत ग्रामपंचायत व नागरिकांनी यापूर्वी अनेकदा पाेलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. परंतु त्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. काही दिवसांपूर्वी पाेलिसांनी दारू विक्री करणाऱ्यांना पकडले हाेते. परंतु त्यावर पुढे काय कारवाई झाली, हे कळायला मार्ग नाही. वारंवार तक्रारी करूनदेखील गावात सर्रास दारू विक्री सुरू आहे. यावर पाेलिसांचे नियंत्रण नसल्याचा आराेप गावकऱ्यांचा आहे. या अवैध दारू विक्रीमुळे गावात असामाजिक तत्त्वांना उधाण आले असून, यावर तात्काळ आळा घालणे गरजेचे झाले आहे. दारू विक्री बंद न केल्यास कार्यकर्त्यांसह पाेलीस ठाण्यासमाेर उपाेषण करू, असा इशारा झाेडापे यांनी निवेदनातून दिला आहे.

Web Title: Schools, government offices became liquor dens