शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

शालेय जीवनातच ‘तो’ बनला मुन्नाभाई

By admin | Updated: July 14, 2015 02:58 IST

दहावीत प्रवेश घेण्यासाठी एका शाळकरी मुलाने केलेले ‘चौर्यकर्म’ लक्षवेधी ठरले आहे. नववी नापास झालेल्या या

नागपूर : दहावीत प्रवेश घेण्यासाठी एका शाळकरी मुलाने केलेले ‘चौर्यकर्म’ लक्षवेधी ठरले आहे. नववी नापास झालेल्या या विद्यार्थ्याची ‘हुशारी’ पालक, शाळा प्रशासन आणि पोलिसांनाही चक्रावून टाकणारी आहे. अनेकांना तोंडात बोटं घालायला लावणाऱ्या आणि चोरी तसेच फसवणुकीचा आरोपी बनलेला हा विद्यार्थी केवळ १५ वर्षे वयाचा आहे. लकडगंजमधील विनायकराव देशमुख हायस्कूलमध्ये गेल्या सत्रात तो नववीत शिकत होता. अभ्यास व्यवस्थित न केल्यामुळे त्याला चांगल्या प्रकारे पेपर सोडवता आले नाही. त्यामुळे तो नापास झाला.दरम्यान, या शाळेत जून २०१५ मध्ये चोरी झाली. चोरट्याने शाळेच्या कार्यालयाचे कुलूप तोडून कपाटामधील ९ व्या वर्गाचे कोरे प्रगती पुस्तक, एसएससीचे बुक नं. ८ मधील एसी क्र. ७३५ ते ८०० असे कोरे आणि ७०१ ते ७३४ पर्यंत टीसी लिहिलेले पुस्तक, चाव्यांचा गुच्छा आणि मुख्याध्यापिका सरिता भांगरेकर यांच्या सहीचा स्टॅम्प चोरून नेला होता. शाळेच्यावतीने तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. महिनाभराच्या चौकशीत शाळेतून चोरीला गेलेल्या टीसी व प्रगतीपत्राच्या आधारे वर्धमाननगरातील हिंदुस्तान विद्यालयात एका विद्यार्थ्याने दहावीत प्रवेश घेतल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी या शाळेत संपर्क केला. चौकशीत उघड झालेल्या माहितीनंतर शाळा प्रशासनच नव्हे तर पोलिसही चक्रावले.(प्रतिनिधी)हुशारी अंगलट ४३ मे रोजी नापास झाल्याचे ‘त्याला’ कळले. मात्र, आपण नापास झाल्याचे घरी समजल्यास पालक रागावतील, हे ध्यानात घेऊन त्याने शक्कल लढवली. ज्या शाळेत तो शिकत होता, त्या शाळेत त्याने संबंधित कागदपत्रांची चोरी केली. त्यानंतर ९ वी उत्तीर्ण झाल्याचे बनावट प्रगतीपत्र आणि टीसी बनविली. त्याआधारे हिंदुस्तान विद्यालय, वर्धमाननगर येथे १० व्या वर्गात प्रवेश घेतला. तो येथे नियमित शाळेतही जाऊ लागला. गुन्हे दाखल ४पोलिसांच्या चौकशीत विद्यार्थ्याची चोरी आणि बनवाबनवी उघड झाली. दोन्ही शाळेच्या प्रशासनाला ती पोलिसांनी कळविली. त्यामुळे शाळेतर्फे दीपश्री दीपक मुंजे (वय ५७) यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीसोबतच त्याच्यावर फसवणुकीचाही गुन्हा दाखल केला. या विद्यार्थ्याचे आता काय करावे, असा प्रश्न पोलीस, शाळा प्रशासन आणि पालकांना पडला आहे.