शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

स्कार्फने केला घात, घडला थरार

By admin | Updated: June 3, 2015 02:30 IST

प्रत्यक्ष खुनाच्या एक दिवसअगोदर १० मार्च रोजी कुणाल आणि प्रदीप हे नंदनवन येथील वसतिगृहानजीकच्या एका कॅफेत थांबले होते.

नागपूर : प्रत्यक्ष खुनाच्या एक दिवसअगोदर १० मार्च रोजी कुणाल आणि प्रदीप हे नंदनवन येथील वसतिगृहानजीकच्या एका कॅफेत थांबले होते. मारेकऱ्यांना कुणालच्या प्रेयसीला तिच्याच मैत्रिणीच्या मार्फत दाखवण्यात आले होते. घटनेच्या दिवशी कुणालची प्रेयसी वसतिगृहातून बाहेर पडल्याची माहिती मैत्रिणीने कुणालला दिली होती. लागलीच मारेकऱ्यांनी मोटरसायकलींनी पाठलाग सुरू केला होता.ती कुणालची प्रेयसी नव्हती तर तिच्यासारखी दिसणारी निष्पाप मोनिका किरणापुरे होती. कॉलेजचा गणवेश घालून आणि कुणालच्या प्रेयसीच्या स्कार्फने चेहरा झाकून ती वसतिगृहाकडून आपल्या महाविद्यालयाकडे जाण्यास निघाली होती. अचानक मारेकऱ्यांनी तिच्यावर तीक्ष्ण व धारदार शस्त्रांचे दहा घाव घातले होते. तीक्ष्ण व धारदार जांबिया तिच्या पाठीत भोसकण्यात आला होता. मोनिका आरडाओरड करीत खाली कोसळली तेव्हा तो तसाच पाठीत रुतलेला होता. खून केल्यानंतर लागलीच सर्व आरोपी काटोल येथे पळून गेले होते. कुणालने बँकेतून १ लाख २० हजाराचे कर्ज घेऊन या मारेकऱ्यांना सुपारीची रक्कम दिली होती. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक माधव गिरी यांनी केला. या खटल्यात आतापर्यंत ३१ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम तर आरोपींच्यावतीने अ‍ॅड. सुदीप जयस्वाल आणि अ‍ॅड. नितीन हिवसे यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल किशोर सातोरकर आणि नायक पोलीस अनिल दोनाडकर यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.