शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

अबब! सव्वा अब्जचे घोटाळे; १७ महिन्यात नागपुरातील फसवणुकीच्या घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 10:18 IST

२०१९ पासून १७ महिन्यात नागपूर शहरात थोडेथोडकेनव्हे तर सव्वा अब्जहून अधिक रकमेचे आर्थिक घोटाळे समोर आले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे३० गुन्ह्यांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत आर्थिक फसवणुकीचे गुन्हे तसे नवीन नाहीत. ठराविक अंतराने आर्थिक फसवणूक झाल्याची मोठी प्रकरणे समोर येतच राहतात. २०१९ पासून १७ महिन्यात नागपूर शहरात थोडेथोडकेनव्हे तर सव्वा अब्जहून अधिक रकमेचे आर्थिक घोटाळे समोर आले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर पोलिसांकडे विचारणा केली होती. जानेवारी २०१९ ते मे २०२० या कालावधीत शहरात किती आर्थिक घोटाळ्यांची नोंद करण्यात आली, यात किती रक्कम गुंतली होती, किती प्रकरणात घोटाळ्यांची रक्कम ५० लाखांहून अधिक होती, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते.नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१९ ते ३१ मे २०२० या १७ महिन्याच्या कालावधीत आर्थिक घोटाळ्यांचे एकूण ३० गुन्हे दाखल झाले. या घोटाळ्यांमध्ये १ अब्ज ३२ लाख रुपयांची रक्कम गुंतली होती. विशेष म्हणजे झालेल्या गुन्ह्यांपैकी २४ प्रकरणात गुंतलेली रक्कम ही ५० लाख किंवा त्याहून अधिक होती.

लॉकडाऊनच्या कालावधीत एकच गुन्हाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन करण्यात आले होते. २५ मार्च ते ३१ मे या लॉकडाऊनच्या कालावधीत बहुतांश व्यवहार बंदच होते. या कालावधीत आर्थिक फसवणुकीचा केवळ एकच गुन्हा नोंदविण्यात आला. संबंधित गुन्हा तीन हजार चौरस फुटाच्या प्लॉटसंदर्भात होता.

उकल झालेल्या प्रकरणांची माहिती का नाही ?१७ महिन्याच्या कालावधीत गुन्हे शाखेने आर्थिक घोटाळ्यांच्या किती प्रकरणांची उकल केली व किती प्रकरणे बंद करण्यात आली, याची विचारणा कोलारकर यांनी केली होती. मात्र याबाबत माहिती देण्याचे टाळण्यात आले. मागणी केलेल्या माहितीचा बोध होत नसल्याने प्रत्यक्ष कार्यालयात येऊन सांगावे, त्यानंतर माहिती पुरविण्यात येईल, असे माहिती अधिकाराच्या उत्तरात नमूद करण्यात आले आहे. स्पष्ट शब्दात माहिती विचारली असतानादेखील त्याचा बोध का झाला नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी