शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

सारथीचा मानपत्र वितरण सोहळा ६ जानेवारीला

By admin | Updated: January 3, 2016 03:33 IST

लघु उद्योग व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सारथी या संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारे सारथी पुरस्कार जाहीर करण्यात आले असून ...

नागपूर : लघु उद्योग व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सारथी या संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारे सारथी पुरस्कार जाहीर करण्यात आले असून येत्या ६ जानेवारीला होणाऱ्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव डॉ. अनिरु द्ध वझलवार यांनी पत्रपरिषदेत दिली.उद्योग व वाणिज्य, कला व संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रात मोठे यश गाठलेल्या विदर्भातील व्यक्तींना सारथीच्या पुरस्काराने गेल्या २३ वर्षापासून सन्मानित करण्यात येत आहे. यावर्षीही विदर्भाच्या मातीत जन्मलेल्या किंवा येथे काही काळ घालविलेल्या अशाच गुणवंतांना सारथी मानपत्राने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये उद्योग क्षेत्रातून ए.के. गांधी ग्रुप आॅफ कंपनीज्चे अशोक गांधी आणि विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चरचे व्यवस्थापकीय संचालक अरुण लाखाणी यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रातून स्विमिंगपटू प्रभाकर साठे आणि बुद्धिबळपटू स्वप्नील धोपाडे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रभाकर साठे यांनी स्विमिंगमध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले असून १४४ सुवर्ण, ५२ रौप्य व २६ कांस्य पदके पटकाविली आहेत. दुसरीकडे स्वप्नील धोपाडे याने एक उदयोन्मुख बुद्धिबळपटू म्हणून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली छाप सोडली आहे. कला व संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये ज्येष्ठ मूर्तिकार श्रीराम इंगळे यांना सारथी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय कृषी क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल कृषितज्ज्ञ डॉ.सी.डी. मायी तसेच अटल बहादूर सिंह यांना सारथी परिवार अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे. कुसुमताई वानखेडे सभागृह, उत्तर अंबाझरी मार्ग येथे बुधवारी सायंकाळी ५.४५ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असून मेजर जनरल अजित हरी गद्रे आणि बैद्यनाथ ग्रुपचे सुरेश शर्मा आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. पत्रपरिषदेला सारथीचे चेअरमेन डॉ. सुरेश चांडक, सचिव अमर वझलवार, राजेंद्र राठी, डॉ. मधुकर आपटे, सुधीर एकबोटे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)