शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

किल्ला संवर्धनासाठी सरसावली तरुणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:08 IST

उमरेड : येथील पुरातन गोंडकालीन किल्ल्याचे वैभव आणि अस्तित्त्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याकडे अनेकदा लक्ष वेधल्या गेले. शासन ...

उमरेड : येथील पुरातन गोंडकालीन किल्ल्याचे वैभव आणि अस्तित्त्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याकडे अनेकदा लक्ष वेधल्या गेले. शासन प्रशासनाने केवळ बाताच केल्या. निदान आपण स्वच्छता मोहीम राबवू शकतो, असा निर्धार करीत शहरातील डझनभर संस्थेला सोबतीला घेत किल्ला संवर्धनासाठी तरुणाई सरसावली. उमरेड येथील राजाधिराज ढोलताशा पथक आणि विदर्भ ट्रॅकर्स, नागपूर या संस्थेच्या सदर उपक्रमाच्या हाकेला अनेकांनी देत प्रतिसाद दिला. यावेळी प्रा. डॉ. सुषमा लाखे, नगरसेवक सतीश चौधरी, रोहीत पारवे, प्रा. डॉ. प्रमोद लाखे आदींची उपस्थिती होती.

छत्रपती क्रीडा मंडळ, मातृभूमी क्रीडा मंडळ, सिद्धार्थ क्रीडा मंडळ, शक्ती क्रीडा मंडळ, स्वराज्यसेवा प्रतिष्ठान, भाजपा युवा मोर्चा, भरारी बहुद्देशिय व शैक्षणिक संस्था, युनिक सायकलींग क्लब, छत्रपती शिवाजी फाऊंडेशन आणि गणेश उत्सव कमिटी डब्लूसीएल, जुगाड फाऊंडेशन, सेवन स्टार क्रीकेट क्लब, शिवशाही गु्रप, जे. डब्लू. संस्था, एसबीसीटी ग्रुप, युवा प्रहार अकादमी, टायगर ग्रुप, अष्टविनायक डान्स ग्रुप या संस्थांचा या कौतूकास्पद उपक्रमात सहभाग होता. किल्ला परिसरात असलेली झुडपांची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. शिवाय स्वच्छता आणि सौंदर्यीकरण यासाठी या तरुणांनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरात वृक्षारोपन सुद्धा केल्या गेले. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्यात सुद्धा हे सर्व तरुण एकजुटीने किल्ला संवर्धनसाठी एकत्रित येणार आहेत.

सुमित शरणागत, स्वप्नील ब्रह्मे, राजेश भुरसे, स्वप्नील चौधरी, रोहीत बक्सरे, वैभव सोनवणे, रोहीत बिलसे, तुषार ढोरे, प्रमोद रघुते, विजय बालपांडे, स्वप्निल गंधरवार, गणेश कन्नन, आर्यन सहारे, निकांशु झाडे, सागर जिभकाटे, सागर ठाकरे, प्रफुल बांते, आशिष तायडे, आयुष मांढरे, निखिल उताणे, कार्तिक पराये आदींनी सहकार्य केले.

उमरेड येथील किल्ला परिसरात स्वच्छता मोहीम राबविताना युवक.