शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील पानठेल्यांवर सर्रास होतेय ‘ई-सिगारेट्स’ची विक्री

By योगेश पांडे | Updated: March 1, 2023 08:00 IST

Nagpur News बेकरी प्रोडक्ट्स विक्रीचा परवाना असताना एका व्यक्तीने चक्क दुकानाला पानठेला बनवत बंदी असलेल्या ई-सिगारेट्सची विक्री सुरू केली होती. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या धाडीदरम्यान ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या हाती लागले दोन आरोपी

नागपूर : बेकरी प्रोडक्ट्स विक्रीचा परवाना असताना एका व्यक्तीने चक्क दुकानाला पानठेला बनवत बंदी असलेल्या ई-सिगारेट्सची विक्री सुरू केली होती. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या धाडीदरम्यान ही बाब समोर आली आहे. गुन्हे शाखेने शहरात बजाजनगर व माटे चौकात पानठेल्यांवर धाड टाकत ई-सिगारेट्स विक्रीच्या रॅकेटचा भंडाफोड केला.

केंद्र शासनाने ‘ई-सिगारेट्स’च्या विक्रीला बंदी घातली असूनदेखील याची लपून विक्री सुरू असते. नागपुरात ई-सिगारेट्सची विक्री होत असल्याची टीप गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. बजाजनगरातील विजय पान पॅलेस येथे ई-सिगारेट्स मिळत असल्याच्या माहितीला खबऱ्यांनी दुजोरा दिला. त्यानंतर पोलिसांनी तेथे धाड टाकली. सिमेंटचे बांधकाम असलेल्या पक्क्या दुकानाला पानठेल्याचे स्वरूप देण्यात आले होते. तेथे पोलिसांना ई-सिगारेट्ससह विविध फ्लेवर्सचे तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर्ड पॅकेट्सदेखील आढळले. पोलिसांनी जवळपास २५ हजारांचा माल जप्त केला. संबंधित दुकानाला बेकरी प्रोडक्ट्स विक्रीचा परवाना असताना ई-सिगारेट्सची विक्री सुरू असल्याचे चौकशीदरम्यान स्पष्ट झाले. पोलिसांनी अशोक विजयसिंह राठोड (डोबीनगर हाऊसिंग सोसायटी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी धाड माटे चौकाजवळील गॅलेक्सी अपार्टंमेंटमधील टेक्सास स्मोक शॉप, एम. के. एंटरप्रायझेस येथे टाकण्यात आली. तेथेदेखील पोलिसांना २० हजार रुपयांच्या प्रतिबंधित ई-सिगारेट्स आढळून आल्या. संबंधित ठिकाणी रात्री उशिरापर्यंत तरुणांना या ई-सिगारेट्स पुरविण्यात येत होत्या. तसेच या दुकानामुळे परिसरातील नागरिकांचा त्रासदेखील वाढलेला आहे.

तरुण ‘टार्गेट’, ‘इम्पोर्ट’वर भर

पाश्चात्त्य देशांप्रमाणेच आपल्याकडेदेखील तरुणांना ई-सिगारेटचा विळखा पडतो आहे. बंदी असल्याने उपराजधानीतही सिगारेट सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने अगदी बाहेरून याला ‘इम्पोर्ट’ करण्यात येत आहे. याकरिता काही विशिष्ट ‘एजंट’देखील शहरात सक्रिय आहेत. यात वापरण्यात येत असलेले रसायन धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे या सिगारेटपासूनदेखील दूरच राहिले पाहिजे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी