शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

सलीम मलिकच्या पोलीस कोठडीत वाढ

By admin | Updated: November 13, 2015 02:48 IST

दहशतवादी कारवायाप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाच्या ताब्यात असलेल्या सलीम मलिक ऊर्फ हफीज मुजीबूर रहेमान याच्या पोलीस

अवकाशकालीन न्यायालय :दहशतवादी कारवाई नागपूर : दहशतवादी कारवायाप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाच्या ताब्यात असलेल्या सलीम मलिक ऊर्फ हफीज मुजीबूर रहेमान याच्या पोलीस कोठडीत विशेष अवकाशकालीन न्यायालयाचे न्यायाधीश जे.आर. घाडगे यांच्या न्यायालयाने १८ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली. सलीम मलिक याला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) १ नोव्हेंबर २०१५ रोजी बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या कलम १५, १६ आणि १८ अन्वये अटक केली होती. त्याला त्यावेळी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला १२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. पोलीस कोठडीची मुदत संपताच गुरुवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. प्रकरण असे की, २५ सप्टेंबर २०१५ रोजी ईदनिमित्त मेंढिया मशीदमध्ये नमाज आयोजित करण्यात आले होते. नमाज संपल्यानंतर अब्दुल मलिक अब्दुल रज्जाक याने बंदोबस्तासाठी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर चाकूने हल्ला केला होता. गाय आणि बैलांच्या कत्तलींवर बंदी आणली, असे तो म्हणत होता. हल्ल्यात तीन पोलीस जवान जखमी झाले होते. याप्रकरणी अब्दुल मलिक याच्याविरुद्ध भादंविच्या ३०७, ३३२, ३३३, १५३, ३५३, १८६, भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४/२५ आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या कलम १५, १६ आणि १८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौकशीत अब्दुल मलिक याने सलीम मलिक ऊर्फ हफीज मुजीबूर याने जिहादसंदर्भात व्हिडिओ सीडी आणि साहित्य दाखविल्याची बाब पोलिसांना सांगितली होती. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सलीम मलिक याला हजर करून न्यायालयाला वाढीव पोलीस कोठडी रिमांडची मागणी करताना असे सांगितले की, आरोपीच्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये आरोपीच्या घरून ६० सीडी आणि उर्दू भाषेतील पुस्तके जप्त करण्यात आली आहेत. त्यापैकी काही आक्षेपार्ह आहेत. आरोपीचे मोबाईल परीक्षणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे. आरोपीच्या वतीने न्यायालयात हजर झालेले अ‍ॅड. मीर नगमान अली यांनी वाढीव पोलीस कोठडीस विरोध केला. आरोपी हा एका विशिष्ट समुदायातील असल्याने पोलिसांवरील साध्या हल्ल्याच्या घटनेला दहशतवादी कारवायाचे स्वरूप देण्यात आले, जप्त सीडी आणि उर्दू भाषेतील साहित्यात जिहादबाबत कोणताही उल्लेख नाही, असेही अ‍ॅड. अली म्हणाले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ केली. (प्रतिनिधी)