शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

सख्खा भाऊ बनला वैरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - वारंवार मनाई करूनही लहान भाऊ बाथरूम वापरत असल्याच्या क्षुल्लक कारणावरून मोठ्या भावाने त्याला लोखंडी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - वारंवार मनाई करूनही लहान भाऊ बाथरूम वापरत असल्याच्या क्षुल्लक कारणावरून मोठ्या भावाने त्याला लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास ही घटना घडली.

स्वप्निल पांडुरंग बनकर (वय २९) असे जखमीचे तर राहुल पांडुरंग बनकर (वय ३१)असे आरोपीचे नाव आहे. स्वप्निल आणि राहुल हे दोघे सख्खे भाऊ आहेत. ते जुना भंडारा मार्गावरील प्रजापती नगरात एकाच घरात वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहतात. बाथरुम वापरतो म्हणून राहुल स्वप्निलला वारंवार विरोध करीत होता. त्याला न जुमानता स्वप्निलने त्याचे बाथरूम वापरणे सुरूच ठेवल्याने त्यांच्यात नेहमीच वाद होत होता. बुधवारी रात्री असेच झाले. वारंवार सांगूनही तू ऐकत नाही, असे म्हणत राहुलने शिवीगाळ सुरू केली. तुला आता मारूनच टाकतो, असे म्हणत आरोपी राहुलने स्वप्निलवर स्टीलच्या रॉडने आणि लोखंडी बादलीने हल्ला चढवला. डोक्यावर, छातीवर जबर फटके हाणल्याने स्वप्निल गंभीर जखमी झाला. आरडाओरड ऐकून शेजारी धावले. त्यांनी स्वप्निलला आरोपीच्या तावडीतून सोडवल्यानंतर इस्पितळात दाखल केले. मिळालेल्या माहितीवरून वाठोडा पोलिसांनी आरोपी राहुलविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला.

----