शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

सद्भावनानगर बनले कचरानगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:12 IST

नागपूर : उपराजधानीचा झपाट्याने कायापालट होत आहे. शहरातील नागरिकांना विविध सोयीसुविधा मिळत आहेत. परंतु पूर्व नागपुरातील सद्भावनानगरात नागरिकांना विविध ...

नागपूर : उपराजधानीचा झपाट्याने कायापालट होत आहे. शहरातील नागरिकांना विविध सोयीसुविधा मिळत आहेत. परंतु पूर्व नागपुरातील सद्भावनानगरात नागरिकांना विविध समस्यांनी ग्रासून टाकले आहे. या भागात नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महापालिकेने त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अनेकदा निवेदने दिली. तरीसुद्धा अद्याप त्यांच्या मागण्यांवर काहीच कारवाई करण्यात आलेली नाही.

गटारलाईनमुळे परिसरात दुर्गंधी

गटारलाईनचे चेंबर जागोजागी तुटलेले आहे. त्यामुळे घाण पाणी रस्त्यावर वाहते. परिसरातील नागरिकांना त्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. घाण पाण्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने गटारलाईनची झाकणे दुरुस्त करावीत, या मागणीचे निवेदन नागरिकांनी अनेकदा दिली. परंतु त्यावर काहीच उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची माहिती नागरिकांनी दिली.

सार्वजनिक विहिरीची दुरवस्था, रस्त्यावर बांधकामाचे साहित्य

या भागात अतिशय जुनी विहीर आहे. या विहिरीतून पूर्वी संपूर्ण परिसराला पाणीपुरवठा होत होता. सध्या या विहिरीची दुरवस्था झाली आहे. नागरिकांनी या विहिरीत कचरा टाकल्यामुळे विहिरीचे पाणी दूषित झाले आहे. या विहिरीची सफाई करावी अन्यथा ही विहीर बुजवून टाकावी, अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत. तसेच या भागातील अंतर्गत रस्त्यावर नागरिकांनी जागोजागी बांधकामाचे साहित्य ठेवलेले असल्यामुळे अपुरा रस्ता रहदारीसाठी उरतो. त्यामुळे अपघाताची शक्यता वर्तविण्यात येते. महापालिकेने रस्त्यावर ठेवलेले बांधकामाचे साहित्य जप्त करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

गार्डन, सार्वजनिक मैदानाची दुरवस्था

या भागात लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे. परंतु गार्डनमध्ये कुठलीच खेळणी उपलब्ध नसल्यामुळे लहान मुलांची गैरसोय होत आहे. तसेच नासुप्रचे समाजभवन या भागात असून, त्याची नियमित देखभाल होत नाही. या समाजभवनात नागरिक कचरा आणून टाकणे, कपडे वाळविणे, बांधकामाचे साहित्य ठेवत असल्यामुळे समाजभवनाची दुरवस्था झाली आहे. परिसरात मोठे मैदान आहे. परंतु या मैदानात असामाजिक तत्त्वांचा उपद्रव राहतो. जुगार खेळणे, दारू पिणे अशी कृत्ये असामाजिक तत्त्व करीत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

स्ट्रीट लाईट झाडाच्या फांद्यात

परिसरातील झाडे वाढली आहेत. त्यामुळे स्ट्रीट लाईट झाडाच्या फांद्यात अडकले असून रस्त्यावर या स्ट्रीट लाईटचा प्रकाश पडत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावर अंधार असतो. त्यामुळे वाहनचालकांना तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. त्यासाठी महावितरणने झाडाच्या फांद्या तोडून स्ट्रीट लाईट मोकळे करावेत, अशी मागणी होत आहे. या भागात सफाई कर्मचारी नियमित येत नसल्याची माहिती नागरिकांनी दिली. त्यामुळे परिसरात कचरा साचून राहतो. महापालिकेने या भागात नियमित सफाई कर्मचारी पाठविण्याची मागणी होत आहे.

गटारलाईनची झाकणे दुरुस्त करावीत

गटारलाईनचे चेंबर तुटल्यामुळे घाण पाणी रस्त्यावर वाहून दुर्गंधी पसरते. त्यामुळे महापालिकेने तुटलेली गटारलाईनची झाकणे दुरुस्त करण्याची गरज आहे.

- सुनिता वरेकर, महिला

मैदानातील बांधकामाचे साहित्य हटवावे

मुलांना खेळण्यासाठी असलेल्या मैदानात नागरिकांनी आपले बांधकामाचे साहित्य ठेवलेले आहे. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी जागा उरत नाही. त्यामुळे हे बांधकामाचे साहित्य हटविण्याची गरज आहे.

- समीर खान, नागरिक

असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करावा

परिसरात असलेल्या सार्वजनिक मैदानात असामाजिक तत्त्व गोळा होतात. जुगार खेळणे, दारू पिणे असे कृत्य ते करतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.

-हिवराम खापरे, नागरिक

स्ट्रीट लाईट मोकळे करावेत

झाडाच्या फांद्यात अडकल्यामुळे रस्त्यावर स्ट्रीट लाईटचा प्रकाश पडत नाही. वाहनचालक तसेच नागरिकांना अंधारातून मार्ग काढत जावे लागते. त्यामुळे झाडाच्या फांद्या तोडून स्ट्रीट लाईट मोकळे करावेत.

-अमोल आखरे, नागरिक

सफाई कर्मचारी नियमित येण्याची गरज

परिसरात सफाई कर्मचारी येत नाहीत. त्यामुळे कचरा साचून राहतो. त्याचा आरोग्यावर परिणाम होत असून महापालिकेने नियमित सफाई कर्मचारी पाठविण्याची गरज आहे.

-शोभा नागमोते, महिला

सार्वजनिक विहिरीची सफाई करावी

सार्वजनिक विहिरीत नागरिक कचरा आणून टाकतात. त्यामुळे विहीर दूषित झाली आहे. महापालिकेने या सार्वजनिक विहिरीची सफाई करून ती नागरिकांना उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी.

-प्रियविंद शहारे, महिला

रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे

रस्त्यावर नागरिकांनी बांधकामाचे साहित्य टाकले आहे. त्यामुळे रहदारीस रस्ता उरत नाही. अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेने रस्त्यावर ठेवलेले साहित्य जप्त करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याची गरज आहे.

-लता वांढरे, महिला

.............