शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
हरभजन सिंगविरोधात समर्थकांचा रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
4
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
5
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
6
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
7
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
8
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
9
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
10
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
11
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
18
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
19
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
20
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
Daily Top 2Weekly Top 5

मुले पळविणाऱ्या टोळीची अफवा

By admin | Updated: March 27, 2017 02:52 IST

कधी देहूरोड रेल्वे स्थानकावर, तर कधी तळेगाव, पिंपरी आदी भागात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी दिसून आली,

पिंपरी : कधी देहूरोड रेल्वे स्थानकावर, तर कधी तळेगाव, पिंपरी आदी भागात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी दिसून आली, अशा अफवा गेल्या काही दिवसांपासून शहरात पसरू लागल्या आहेत. व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून ती पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मुले पळविणारी टोळी शहरात सक्रिय झाली आहे, असे सर्वत्र बोलले जात आहे. नागरिकांमध्ये भीती पसरेल, अशी माहिती व्हॉट्स अ‍ॅपवर प्रसारित होत आहे. परंतु मूल पळविल्याचे एकही खात्रीलायक वृत्त माध्यमांतून प्रसारित झालेले नाही. काही दिवसांपूर्वी चिखली परिसरातून गायब झालेली तीन अल्पवयीन मुले मुंबई रेल्वे स्थानकात आढळून आली. ही मुले स्वत:च रेल्वेने मुंबईला गेली होती. त्यांना कोणीही फूस लावून अगर पळवून नेले नव्हते. १६ वर्षांखालील अल्पवयीन मुले घरातून निघून गेल्याने बेपत्ता झाले, अशी पोलीस दप्तरी नोंद होत नाही. त्यांचे अपहरण झाले, अशीच नोंद पोलिसांकडे केली जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या अपहरणाच्या घटनांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे, हे निदर्शनास येते. अशा घटनांमध्ये वाढ याचाच अर्थ लहान मुलांना कोणीतरी पळवून नेत आहे, असा काढला जातो. प्रत्यक्षात अल्पवयीन मुले घरातून स्वत:हून निघून गेलेली असतात. नुकतीच एक घटना बालेवाडीतील क्रीडा संकुलात घडली. विद्यार्थी खेळाडंूसाठी उपलब्ध करून दिलेल्या वसतिगृहातून वेळोवेळी कोणाबरोबर तरी बाहेर गेलेल्या मुलीचे कायदेशीर कस्टडीतून अपहरण केले, अशा स्वरूपाचा गुन्हा  संबंधित तरुणाविरुद्ध दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)