नागपुरात गॅस सिलिंडरसाठी राडा ! संतापलेल्या ग्राहकांनी गोदामातून सिलिंडर पळवले; कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 13:47 IST2026-04-09T13:47:18+5:302026-04-09T13:47:55+5:30

Nagpur : तासनतास रांगेत उभे राहूनही सिलिंडर मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी नागपूरच्या जरीपटका भागातील एका गॅस एजन्सीच्या गोदामावर मोठा गोंधळ घातला.

Ruckus over gas cylinders in Nagpur! Angry customers snatch cylinders from warehouse; Employees beaten up | नागपुरात गॅस सिलिंडरसाठी राडा ! संतापलेल्या ग्राहकांनी गोदामातून सिलिंडर पळवले; कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

Ruckus over gas cylinders in Nagpur! Angry customers snatch cylinders from warehouse; Employees beaten up

नागपूर : तासनतास रांगेत उभे राहूनही सिलिंडर मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी नागपूरच्या जरीपटका भागातील एका गॅस एजन्सीच्या गोदामावर मोठा गोंधळ घातला. रांगेतील गोंधळ आणि वशिलेबाजीमुळे संताप इतका अनावर झाला की, काही नागरिकांनी थेट गोदामातून सिलिंडर उचलून पळ काढला. या झटापटीत एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की देखील करण्यात आली.

​नेमकी घटना काय?

​नागपूरच्या जरीपटका परिसरातील HP गॅस एजन्सीच्या गोदामावर आज सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी होती. सिलिंडरच्या प्रतीक्षेत अनेक नागरिक पहाटेपासून रांगेत उभे होते. मात्र, काही लोकांनी रांगेचे नियम मोडून थेट सिलिंडर मिळवण्याचा प्रयत्न केला. यामुळे प्रामाणिकपणे रांगेत उभे असलेल्या नागरिकांचा संयम सुटला आणि वादाला सुरुवात झाली.

​गोदामात शिरून सिलिंडरची पळवापळवी

​वादाचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले. संतापलेल्या जमावाने गोदामात घुसून सिलिंडर उचलण्यास सुरुवात केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, संतप्त नागरिकांनी त्यांना धक्काबुक्की केली. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. काही नागरिक सिलिंडर घेऊन पसार झाले, तर काहींनी गोंधळ पाहून तिथेच सिलिंडर सोडून दिले.

​पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण

​परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून एजन्सीच्या व्यवस्थापनाने तातडीने पोलिसांना माहिती दिली. जरीपटका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर काही लोकांनी सिलिंडर परत केले, मात्र अद्याप काही सिलिंडर बेपत्ता असल्याची माहिती एजन्सीकडून देण्यात आली आहे.

हा केवळ गोंधळ नाही, तर सर्वसामान्यांच्या सहनशीलतेचा अंत!

अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी गॅस कंपन्यांनी वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक करणे आणि प्रशासनाने अशा गर्दीच्या ठिकाणी देखरेख ठेवणे काळाची गरज आहे. अन्यथा, सामान्य जनतेचा हा संताप भविष्यात अधिक हिंसक वळण घेऊ शकतो.

​काय म्हणाले संबंधित?

​"सकाळपासून नागरिक रांगेत होते. रांगेत न लागता सिलिंडर घेण्याच्या प्रयत्नातून हा वाद निर्माण झाला. गोंधळ इतका वाढला की लोकांनी गोदामातून सिलिंडर उचलून नेले. आम्ही पोलिसांत या प्रकाराची माहिती दिली आहे."
- हरीश मोहरले, अधिकारी, गॅस एजन्सी

​"आम्ही तासनतास उन्हात उभे राहतो आणि काही लोक मागच्या दाराने सिलिंडर घेऊन जातात. एजन्सीच्या ढिसाळ नियोजनामुळेच आज हा गोंधळ उडाला आहे. सर्वसामान्यांचे हाल होत आहेत."
- प्रांजली कान्होरे, संतप्त ग्राहक


 

Web Title : नागपुर: गैस सिलेंडर के लिए हाथापाई! ग्राहकों ने सिलेंडर चुराए, कर्मचारियों से भिड़े।

Web Summary : नागपुर में गैस सिलेंडर के लिए लंबी लाइनों और भाई-भतीजावाद से परेशान निवासियों ने एक एजेंसी में तोड़फोड़ की, सिलेंडर चुराए और कर्मचारियों से भिड़ गए। पुलिस ने हस्तक्षेप किया, कुछ सिलेंडर अभी भी लापता हैं। ग्राहकों ने अराजकता के लिए खराब प्रबंधन को जिम्मेदार ठहराया।

Web Title : Nagpur: Gas cylinder chaos! Angry customers steal cylinders, clash with staff.

Web Summary : Frustrated Nagpur residents, facing long queues and favoritism, ransacked a gas agency, stealing cylinders and clashing with staff. Police intervened after the chaos, with some cylinders still missing. Customers cite poor management for the unrest.