शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

रा.स्व. संघातर्फे विदर्भात सेवाकार्यासाठी पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 10:44 IST

समाजातील अशा गरजूंना विदर्भभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सहकार्याचा हात देण्यात येत आहे. विविध सेवा प्रकल्पांच्या माध्यमातून गरिबांपर्यंत ‘फूड किट’ वैद्यकीय सहकार्य पोहोचविण्यात येत आहे, सोबतच स्थलांतरितांच्या पोटापाण्याची सोयदेखील करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयोगेश पांडेनागपूर : ‘कोरोना’मुळे नागपूरसह देशातील मोठी शहरे ‘लॉकडाऊन’ झाली असल्यामुळे कष्टकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. समाजातील अशा गरजूंना विदर्भभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सहकार्याचा हात देण्यात येत आहे. विविध सेवा प्रकल्पांच्या माध्यमातून गरिबांपर्यंत ‘फूड किट’ वैद्यकीय सहकार्य पोहोचविण्यात येत आहे, सोबतच स्थलांतरितांच्या पोटापाण्याची सोयदेखील करण्यात येत आहे.संकटाच्या या काळात समाजातील गरजूंच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी समोर यावे व त्यांच्यापर्यंत अन्न पोहोचावे, असे आवाहन सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले होते, तर सरसंघचालकांनीदेखील वर्षप्रतिपदेला स्वयंसेवकांना साद घातली होती. त्यानंतर तातडीने गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी स्वयंसेवकांचे नियोजन सुरू झाले. विदर्भातील सर्व मोठ्या शहरांमध्ये गरजूंपर्यंत भागनिहाय मदत पोहोचविली जात आहे. नागपुरातील ३८० झोपडपट्ट्यांमध्ये ‘कोरोना’संदर्भात जनजागृतीदेखील सुरू आहे. या वस्त्यांमध्ये राहणाºया लोकांना उपाशी राहावे लागू नये याची काळजी घेण्यात येत आहे. सर्वांना जीवनावश्यक वस्तू व आरोग्य सेवांचा पुरवठा सुरू राहावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालनगरजूंना मदत पोहोचवत असताना स्वयंसेवकांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करावे, असे आवाहन संघातर्फे करण्यात आले होते. विदर्भात सगळीकडेच ही बाब कटाक्षाने पाळली जात आहे. शासनाच्या नियमांचे पालन करत मोजकेच स्वयंसेवक प्रत्यक्ष जाऊन मदत पोहोचवत असल्याची माहिती विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख अनिल सांबरे यांनी दिली. नागपूर शहराला १२ नगरे आणि ३८ सेवा वस्त्यांमध्ये विभाजित करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवकांनी मदतसामुग्री आणि सहायता संकलन केंद्र बनवले आहेत.दररोज हजारांहून अधिक घरी शिधावाटपसंघ स्वयंसेवकांतर्फे नागपुरात दररोज हजारांहून अधिक घरी शिधावाटप करण्यात येत आहे. यात ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला, मजूर, कामगार, रेशनकार्ड नसणाऱ्यांचा समवेश आहे. अकोल्यामध्ये आदर्श संस्कार मंडळाच्या वतीने सेवाकार्य सुरू आहे. खामगावात तर स्वयंसेवक घरून जेवणाचे डबे तयार करून दररोज ३०० हून अधिक गरजूंकडे पोहोचवत आहेत. वर्धा, यवतमाळ, पुसद, ब्रह्मपुरी, गडचिरोली येथेदेखील शिधा गरीब लोकांच्या घरी पोहोचविल्या जात आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांत सेवाकार्य सुरू आहे.वैद्यकीय आघाडीवरदेखील पुढाकारसंघ स्वयंसेवकांतर्फे ‘कोरोना’संदर्भात जनजागृतीसाठी विशेष वैद्यकीय हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. यात राज्यातील ४५ हून अधिक डॉक्टर्स थेट लोकांशी संवाद साधत आहेत. शिवाय रक्तसाठ्याची कमतरता लक्षात घेता, ‘युथ फॉर सेवा’च्या माध्यमातून रक्तदान शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. शिवाय नागरिकांना ‘फेस मास्क’, ‘सॅनिटायझर’, साबणांचे वाटप करण्यात येत आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ