Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा अधिकार; कुणाला मतदान करायला हवं? हेही सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 08:29 IST2026-01-15T08:28:10+5:302026-01-15T08:29:04+5:30
"...यामुळे नोटा नागरिकांच्या वैतागाच्या दृष्टीने दिेलेला ऑप्शन असला तरी, त्यातल्या त्यात चांगला माणून. अराजक, राजा नसणे हे सर्वात वाईट, असे पितामह भिष्मांनी म्हटले आहे. त्यामुळे कुणीच नाही, त्यापेक्षा कुणीतरी हवा. देश चालण्याच्या दृष्टीने ते महत्वाचे आहे."

Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा अधिकार; कुणाला मतदान करायला हवं? हेही सांगितलं
निवडणुका या लोकशाहीतंत्राचा एक भाग आहे आणि ते जनतेचे करतव्यही आहे. त्यामुळे जनहिताचा विचार करून आपल्याला योग्य वाटतो, त्या उमेदवाराला मत देणे, हे जेव्हा-जेव्हा निवडणुका असतात तेव्हा तेव्हा प्रत्येकाने करायला हवे. त्या दृष्टीने आणि त्या दिवसाचे ते पहिले कर्तव्य असते. म्हणून मी पहिले येऊन नंबर लावला. असे राष्ट्रीय स्वयंसेवक सघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. त्यांनी आज नागपूर महानगर पालिकेसाठी मतदान केले. यानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते.
भागवत पुढे म्हणाले, लोकांनी मतदानासाठी बाहेर पडायला हवे. हे तुम्हीही सांगत असता, निवडणूक आयोगही सांगत असतो आणि आम्हीही सांगत असतो. आता परिणाम जेव्हा होईल तेव्हा होईल.
अराजक, राजा नसणे हे सर्वात वाईट... -
नोटाला का मतदान करू नये, "यासंदर्भात बोलताना भागवत म्हणाले, "नोटा म्हणजे, आपण सर्वांना रिजेक्ट करतो, तेव्हा आपण नको असलेल्या माणसाला प्रमोट करतो असे होते. यामुळे नोटा नागरिकांच्या वैतागाच्या दृष्टीने दिेलेला ऑप्शन असला तरी, त्यातल्या त्यात चांगला माणून. अराजक, राजा नसणे हे सर्वात वाईट, असे पितामह भिष्मांनी म्हटले आहे. त्यामुळे कुणीच नाही, त्यापेक्षा कुणीतरी हवा. देश चालण्याच्या दृष्टीने ते महत्वाचे आहे."
दरम्यान, राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदान होत असून मुंबईसह राज्यातील २८६९ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीसाठी १५ हजार हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत.