शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्र चोरीचे रॅकेट सक्रिय!

By admin | Updated: August 6, 2014 00:58 IST

अमरावतीत ७४ रोहित्रांची चोरी

अकोला : राज्यात विद्युत रोहित्र चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असून, यामागे रॅकेट सक्रीय असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अमरावती परिमंडळात गत दोन वर्षांमध्ये ७४ रोहित्रांची चोरी झाली असून, वाढत्या चोर्‍यांमुळे महावितरणला कोट्यवधीचा फटका सोसावा लागत आहे. महावितरणतर्फे गावोगावी विद्युत वाहिन्यांसह वेगवेगळय़ा क्षमतेची रोहित्रे बसवून लोकांना वीज देण्याची व्यवस्था करण्यात आली; मात्र गत दोन वर्षांपासून विद्युत तारा व रोहित्र चोरीच्या घटना घडत आहेत. अमरावती परिमंडळात गत दोन वर्षांत ७४ रोहित्र चोरी गेली आहेत. त्यामुळे अखंड विद्युत पुरवठा करण्यात महावितरणला अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्युत रोहित्र चोरी करताना विजेचा धक्का लागण्याची भीती असते. त्यामुळे या चोर्‍यांमागे जाणकार व्यक्ती सहभागी असाव्यात, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. रोहीत्र चोरी केल्यानंतर तांबेची तार, त्यामध्ये असलेले इन्सुलेटीव्ह ऑइल कोण विकत घेऊ शकते, याचीही माहिती या क्षेत्राशी संबंधीत व्यक्तीलाच असते. उपकेंद्र, रोहित्रे, विविध क्षमतेच्या ओव्हरहेड आणि अंडरग्राऊंड विद्युत वाहिन्या राज्यभर उभारण्यात आल्या आहेत. नागरी वस्तीसह डोंगराळ भाग, वने व गावागावांमध्ये उभारण्यात आलेल्या विद्युत साहित्याचे रक्षण करणे महावितरणला अवघड जात आहे. शासकीय मालमत्ता असल्यामुळे नागरिकांचे याकडे लक्ष नसते. त्यामुळे चोरट्यांचे फावते. रोहीत्र चोरी गेल्यानंतर ते पुन्हा बसविण्याकरिता महावितरणला लाखो रूपये खर्च करावे लागतात. त्यानंतरही रोहित्र चोरी होणार नाही, याची शाश्‍वती नसते. पोलिसांमध्ये तक्रार करूनही, अमरावती परिमंडळात अद्याप एकाही चोराला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही.