शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते बनले डम्पिंग यार्ड

By admin | Updated: September 14, 2014 01:07 IST

पावसाळी आजाराने नागपूर महापालिकेचा आरोग्य विभाग आधीच त्रस्त असताना, स्वच्छता विभाग आणखी डोकेदुखी वाढवितो आहे. डासांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभाग वस्त्यावस्त्यात फवारणी करीत आहे.

नागपूर : पावसाळी आजाराने नागपूर महापालिकेचा आरोग्य विभाग आधीच त्रस्त असताना, स्वच्छता विभाग आणखी डोकेदुखी वाढवितो आहे. डासांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभाग वस्त्यावस्त्यात फवारणी करीत आहे. घराघरात जाऊन तपासण्या केल्या जात आहेत. मात्र दुसरीकडे कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे या कामावर पाणी फेरल्या जात आहे. शहरातील रस्ते डम्पिंग यार्ड बनले आहेत. रस्त्यावर तीन-चार दिवस कचरा पडून राहतो. पावसामुळे कचरा कुजल्याने दुर्गंधी पसरते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. रस्त्यावर बनलेले डम्पिंग यार्ड आजाराला आमंत्रण देत आहेत. शहरातील सर्वच भागात रस्त्यावरील डम्पिंग यार्ड बघायला मिळतात. स्वच्छता विभागाचे कर्मचारी वस्त्यांमधून कचरा गोळा करून एका ठिकाणी कचरा गोळा करतात. नंतर हा कचरा कंटेनरच्या साहाय्याने भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये पाठविला जातो. मात्र सध्या कचरा उचलणारी यंत्रणा तलावाच्या स्वच्छतेच्या कामात व्यस्त असल्यामुळे रस्त्यावरील डम्पिंग यार्डमध्ये कचऱ्याचे ढिगारे वाढले आहे. आठवडाभरापासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे साठविलेला कचरा कुजला आहे. त्यातून दुर्गंधी सुटली आहे. रस्त्यावरून ये-जा करताना नाक दाबल्याशिवाय प्रवास करता येत नाही, अशी अवस्था झाली आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. याचा त्रास परिसरात राहणाऱ्या लोकांना होत आहे. कचऱ्यामुळे घराघरात माशा, डास वाढले आहेत. या कचऱ्याची व्हिलेवाट लावावी, दुर्गंधी पसरू नये म्हणून कीटकनाशकाची फवारणी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. रामनगर ते रविनगर रस्ता रामनगर ते रविनगर चौकादरम्यान विलासराव देशमुख महाविद्यालयापुढील मोकळ्या जागेवर कचरा डम्पिंग केला जातो. मोकळ्या जागेला लागूनच एक हॉटेल आहे. बाजूला व्यवसायिक परिसर आहे. पावसाळ्यात कचरा नियमित न उचलल्यास दुर्गंधीमुळे त्रास होतो. कचऱ्यामुळे डास वाढले असल्याच्या व्यावसायिकांच्या तक्रारी आहेत. यशोधरानगरात तर रस्त्याला लागून असलेल्या मोकळ्या प्लॉटवर कचऱ्याचे डम्पिंग करण्यात येते. गेल्या ५ ते ६ दिवसांपासून येथून कचरा उचललाच नसल्याची तक्रार लोकांनी केली. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे लोकांना घरात राहणे कठीण झाले आहे. घराघरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. रहाटे कॉलनी चौकाजवळकचऱ्याचे कंटेनर वर्धा रोडवरील धंतोली परिसरातील गोरक्षणच्या अगदी पुढे परिसरातील कचरा आणून जमा केला जातो. महापालिकेने कचऱ्याचे कंटेनर येथून दुसरीकडे नेण्याऐवजी कचरा नागरिकांना दिसू नये म्हणून टीन शेड लावले आहे. मात्र कचऱ्यापासून सुटलेली दुर्गंधी ते थांबवू शकले नाहीत. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्याला याचा त्रास सहन करावा लागतो. डम्पिंग यार्डच्या बाजूला काही विक्रेते बसलेले आहेत. चहाची टपरीसुद्धा डम्पिंग यार्डला लागून आहे. बाजूलाच आॅटोस्टॅण्ड आहे. अगदी काही अंतरावर रहाटे कॉलनी ही उच्चभ्रू लोकांची वसाहत आहे. पावसाळ्यात या डम्पिंगमुळे आजूबाजूला वास्तव्यास असणारे सर्वच त्रस्त आहेत.