शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

रिपोर्ट वेळीच मिळत नसल्याने संक्रमणाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:07 IST

नागरिकांच्या तक्रारी : मनपा प्रशासनाने दखल घेण्याची गरज लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरानोच्या दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यात ...

नागरिकांच्या तक्रारी : मनपा प्रशासनाने दखल घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरानोच्या दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढली. यात प्रामुख्याने शहरातील उच्चभ्रू वस्त्याचा समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यात ७८ बाधितांचे मृत्यू होते, तर मार्च महिन्यात तब्बल ४७२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३० हजारांहून अधिक आहे. दररोज साडेतीन ते चार हजारांच्या आसपास पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. कोरोना साखळी खंडित करण्यासाठी बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींची वेळीच चाचणी होणे गरजेचे आहे. परंतु, चाचणीचा रिपोर्ट वेळीच मिळत नसल्याने तोवर बाधित अनेकांच्या संपर्कात येत असल्याने संक्रमणाचा धोका वाढला आहे.

लक्ष्मीनगर, हनुमाननगर, मंगळवारी व धरमपेठ झोन अंतर्गत अनेक वस्त्यांना प्रतिबंधित क्षेत्र करण्याच्या दृष्टीने मनपा प्रशासनाच्या हालचाली सुरू आहे. कोरोना संक्रमणाची साखळी खंडित करण्यासाठी बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी होणे गरजेचे आहे. चाचणी रिपोर्ट दुसऱ्या दिवशी मिळणे अपेक्षित आहे. काहींना दुसऱ्या दिवशी दुपारी तर काहींना तिसऱ्या दिवशी मिळतो. यादरम्यान संबंधित व्यक्तीला लक्षणे नसल्याने तो सर्वत्र भटकंती करीत असतो. अशा व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे.

शहरात करोनारुग्णांचा शोध घेण्यासाठी आरआरटी पथक व महापालिकेच्या दहाही झोनमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. संबंधित झोनमध्ये तक्रारींचा निपटारा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरात महापालिकेची पाच कोरोना रुग्णालये आहेत. मात्र, सर्वच रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नाहीत. आमदार निवास, व्हीएनआयटी आणि पाचपावली पोलीस निवास केंद्र ही तीन विलगीकरण केंद्रे आहेत. मात्र, या तीनही ठिकाणी एकूण २१५ रुग्ण सध्या विलगीकरणात, तर २८ हजारांपेक्षा जास्त रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.

...

प्रशासनाने दखल घ्यावी

कोरोना चाचणी केल्यानंतर संबंधितांना दुसऱ्या दिवशी सकाळी रिपोर्ट मिळणे अपेक्षित आहे. मात्र, अनेकांना तिसऱ्या दिवशी मिळतो. यासंदर्भात मनपा प्रशासनाने दखल घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.