शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

कोराडी नवरात्र तयारीचा आढावा

By admin | Updated: September 7, 2014 00:53 IST

येथील अश्विन नवरात्र उत्सवादरम्यान अनेक वर्षांपासून महत्त्वाच्या व्यक्तींना मातेचे दर्शन अतिजलद करून देण्यासाठी ‘व्हीआयपी’ दर्शनाची सोय होती. यामुळे सामान्य भाविक दुखावल्या जात होते.

कोराडी : येथील अश्विन नवरात्र उत्सवादरम्यान अनेक वर्षांपासून महत्त्वाच्या व्यक्तींना मातेचे दर्शन अतिजलद करून देण्यासाठी ‘व्हीआयपी’ दर्शनाची सोय होती. यामुळे सामान्य भाविक दुखावल्या जात होते. यावर्षीपासून व्हीआयपी पासेसवर बंदी आणण्याचा निर्णय घेतल्याने आता मातेसमोर राजा आणि रंक सारखेच असणार आहे. शिवाय यावर्षीचा नवरात्रोत्सव कडेकोट बंदोबस्तात पार पडणार आहे. यादरम्यान राजकीय व्यक्तींचे बॅनर, फ्लेक्स, फोटो व कटआऊटस् लावण्यावरही बंदी असणार आहे. महानिर्मितीच्या विश्रामगृहात नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीला उपविभागीय अधिकारी चंद्रकांत बोरकर, संस्थानचे अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, नगराध्यक्ष कांचन कुथे, सरपंच चंद्रशेखर बीरखेडे, महानिर्मिती, अग्निशमन, महसूल, पोलीस, आरोग्य आदी विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते. अश्विन नवरात्र महोत्सवात येणाऱ्या भाविकांव्यतिरिक्त अन्य संशयितांची पोलीस कसून तपासणी करणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे कठोर पाऊल उचलले आहे. सर्व्हे क्रमांक १०४ व १०५ संरक्षण विभागाच्या अधीन असलेल्या जागेबाबतचा वाद मुंबई उच्च न्यायालयाने खारीज केल्याने ही जागा आता मंदिर संस्थानच्या अधीन झालेली आहे.यात्रेदरम्यान दुचाकी वाहनतळ व्यवस्थेचे कंत्राट कोराडी ग्रामपंचायतने काढलेले आहे. ही माहिती विभागीय अधिकारी चंद्रकांत बोरकर यांनी दिली. दहा दिवसीय कार्यक्रमादरम्यान मंदिर परिसरात कोणत्याही राजकीय व्यक्तीचा फोटो व कटआऊट लावता येणार नाही किंवा तसल्याप्रकारची परवानगी मंदिर संस्थान देणार नाही. केवळ संस्थानकडून परवानगी दिलेल्या अत्यावश्यक सेवाधारकांनाच पासेस दिल्या जाणार आहे. मंदिर परिसरात १०० मीटर आतमध्ये केवळ पोलिसांद्वारे निर्देशित व्हीआयपींना येण्यास परवानगी राहणार आहे. पोलीस शिफ्टनुसार कर्तव्य बजावणार आहे. खासगी सुरक्षा रक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. राष्ट्रीय महामार्गावर कोराडी चुंगीनाका ते कोलार नदीपर्यंत पथदिवे लावण्यात आलेले आहेत. महानिर्मिती वीजपुरवठा देणार आहे. खराब झालेल्या नांदा-कोराडी रस्त्यांची दुरुस्ती एल अ‍ॅण्ड टी कंपनी करणार आहे. या मार्गावर तसेच मंदिर परिसरात उच्च अश्वशक्तीचे ट्रान्सफॉर्मर लावण्याचे आदेश महानिर्मिती व वीज वितरण विभागाला दिलेले आहे. कोराडी ग्रामपंचायतच्यावतीने दोन पाण्याचे टँकर तसेच दहा प्याऊ लावले जातील. नगरपंचायत महादुलादेखील पाच प्याऊची व्यवस्था करणार आहे. परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता ३० जणांची चमू कार्यरत असणार आहे. दहा मोबाईल शौचालय, अग्निशमन, आरोग्य, दहा उंच टॉवर लाईट, ४८ सीसीटीव्ही कॅमेरे, सात मेटल डिटेक्टर आदींची सोय करण्याकडे मंदिर संस्थानने पुरेपूर लक्ष दिले आहे. (वार्ताहर)