शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नागनदीच्या मास्टर प्लॅनचा आढावा

By admin | Updated: November 19, 2015 03:34 IST

नागनदी व गांधीसागरचे शुद्धिकरण करण्याच्या दृष्टीने महापालिके ने प्रयत्न चालविले आहेत.

महापौरांचे आवाहन : नागनदी स्वच्छतेबाबत सूचना द्यानागपूर : नागनदी व गांधीसागरचे शुद्धिकरण करण्याच्या दृष्टीने महापालिके ने प्रयत्न चालविले आहेत. याबाबतच्या ड्राफ्ट कन्सेप्ट मास्टर प्लॅनवर चर्चा करण्यासाठी बुधवारी महापौर प्रवीण दटके यांनी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आढावा बैठक घेतली. स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, स्थापत्य विद्युत व प्रकल्प विशेष समितीचे सभापती सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त आर.झेड. सिद्दीकी, अतिरिक्त उपायुक्त प्रमोद भुसारी, अधीक्षक अभियंता प्रकाश उराडे, शशिकांत हस्तक, कार्यकायी अभियंता संजय गायकवाड, राहुल वारके, महेश गुप्ता व श्याम चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी ड्राफ्ट कन्सेप्ट मास्टर प्लॅनचे सादरीकरण करण्यात आले. हा मास्टर प्लॅन अंंितम करण्याचा पूर्वीचाच टप्पा आहे. यात नागनदी स्वच्छ पााण्याने कशी वाहू शकेल. नदीच्या आजूबाजूच्या परिसरात अस्तित्वात असलेले लँड यूज, येणारे सिव्हरेज, नाले आदींचा विचार करून नागनदी स्वच्छ करण्याबाबत एचसीपी डिझाईन कन्सलटंट, अहमदाबाद यांनी तयार केलेल्या ड्राफ्ट मास्टर प्लॅनवर चर्चा करण्यात आली. एचसीपी डिझाईन कन्सल्टंट हे अहमदाबादमध्ये साबरमती नदीच्या विकास आराखड्यावर काम करीत आहे. या कामाचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी तयार केलेल्या सुधारित आराखड्यावर चर्चा करण्यात आली. नागनदीच्या १७ किलोमीटर लांबीच्या क्षेत्रातील असलेल्या विविध बाबींची महेश गुप्ता यांनी माहिती दिली. पावसाळी पाण्याचे नियोजन करण्याबाबत नागनदीच्या सद्यस्थितीची सविस्तर माहिती एचसीपी डिझाईन कन्सलटंट यांना देण्यात यावी, असे निर्देश दटके यांनी दिले. नागनदी अभियानात सहभागी कार्यकारी अभियंता यांची मते जाणून घ्यावी. त्यानंतर आराखड्याला अंतिम स्वरूप द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच गांधीसागर तलावाच्या मास्टर प्लॅनचे सादरीकरण करण्यात आले. तलावाच्या सौंदर्यीकरणाबाबत त्या परिसरातील सर्व नगरसेवकांसोबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्याची सूचना दटके यांनी केली. (प्रतिनिधी)