शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:21 IST

मनपा आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश: विमान, रेल्वे, रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी अनिवार्य लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर ...

मनपा आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश:

विमान, रेल्वे, रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी अनिवार्य

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचा संभाव्य उद्रेक लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागपूर महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शहरासाठी तर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्ह्यासाठी मंगळवारी काही निर्बंध लागू केले आहेत. परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी (टेस्ट रिपोर्ट) अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य असेल. अहवाल निगेटिव्ह असणाऱ्यांना प्रवेश मिळेल. रिपोर्ट नसणाऱ्यांची कोरोना आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. परराज्यातून विमान, रेल्वे, रस्ते मार्गाने येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी ही चाचणी अनिवार्य राहणार आहे.

आज बुधवारपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. राज्य शासनानेदेखील यासंदर्भात प्रत्येक जिल्ह्याला अवगत केले आहे. प्रामुख्याने दिल्ली एनसीआर क्षेत्र, राजस्थान, गुजरात आणि गोवा या राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांकडे कोरोना निगेटिव्ह चाचणी अहवाल तपासणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत

यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा आरोग्य विभाग, पोलीस विभाग तसेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असणारी एक चमू गठित करण्यात आली आहे. या चमूने नागपूर जिल्ह्यात रेल्वेमार्गाने काटोल व नरखेड मार्गाद्वारे येणाऱ्या प्रवाशांची यादी रेल्वे विभागाकडून प्राप्त करून आरटीपीसीआर अहवाल तपासणीबाबतची कारवाई करावी, असे या रवींद्र ठाकरे यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. तसेच सावनेर, नरखेड, रामटेक या रस्ते मार्गाने नागपूर जिल्ह्यात दाखल होणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा क्षेत्रावर तपासणी चौकी तयार करण्याचेदेखील निर्देश देण्यात आले आहेत.