शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

तिजोरीत नाही ‘अर्थ’ निवडणुकीसाठी ‘संकल्प’!

By admin | Updated: June 28, 2014 02:35 IST

एलबीटीमुळे महापालिकेच्या उत्पन्नाला फटका बसला आहे. तिजोरी रिकामी असल्याची ओरड सत्तापक्षातील पदाधिकारी करीत आहेत.

नागपूर : एलबीटीमुळे महापालिकेच्या उत्पन्नाला फटका बसला आहे. तिजोरी रिकामी असल्याची ओरड सत्तापक्षातील पदाधिकारी करीत आहेत. निधी नसल्यामुळे प्रभागातील विकास कामे रखडल्याची ओरड नगरसेवक करीत आहेत. असे असतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी तब्बल १६०० कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी चालविली आहे. तिजोरीत ‘अर्थ’ (पैसा) नाही तरीही विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विकासाचे संकल्प सत्ताधारी करणार आहेत. १ जुलै रोजी महापालिकेच्या सभेत बोरकर हे अर्थसंकल्प सादर करतील. एलबीटीमुळे महापालिकेची आर्थिक स्थिती खराब झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीही पैसे नाहीत. हे लक्षात घेऊन तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी मांडलेल्या २०१३-१४ च्या अर्थसंकल्पाला आयुक्त श्याम वर्धने यांनी सुधारित अर्थसंकल्पात कात्री लावली होती. आयुक्तांनी २०१४-१५ चा अर्थसंकल्प सादर करताना, आपण मांडत असलेला १ हजार ६१ कोटींचा अर्थसंकल्प ‘रिअ‍ॅलिस्टिक’ असल्याचे आवर्जून सांगितले होते.