शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारी रोखण्याचा विद्यार्थ्यांचाही संकल्प

By admin | Updated: January 8, 2015 01:19 IST

शहरात गुन्हेगारी हद्दपार करण्याच्या उद्देशाने बुधवारी जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत पोलीस कर्मचाऱ्यांसह शेकडो विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन गुन्हेगारीवर आळा

रेजिंग डे : शेकडो विद्यार्थ्यांचा जनजागृती रॅलीत सहभाग नागपूर : शहरात गुन्हेगारी हद्दपार करण्याच्या उद्देशाने बुधवारी जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत पोलीस कर्मचाऱ्यांसह शेकडो विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन गुन्हेगारीवर आळा घालण्याचा संकल्प केला. तसेच ‘पोलीस आपले मित्र असून गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा’, असे आवाहनही विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शहरात २ ते ८ जानेवारीदरम्यान ‘रेजिंग डे’ साजरा केला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत दररोज विविध पोलीस ठाणे अंतर्गत स्थानिक शाळा-महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यात स्थानिक परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाते. त्यांना पोलिसांचे कर्तव्य, शस्त्र आणि इतर आवश्यक गोष्टींबाबत मार्गदर्शन केले जाते. बुधवारी गुन्हे शाखेच्या सामाजिक विभागातर्फे जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती. व्हेरायटी चौक येथून या रॅलीला सुरुवात झाली. पोलीस आयुक्त के.के. पाठक यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला रवाना केले. याप्रसंगी सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग, पोलीस उपायुक्त निर्मला देवी, गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर आदींसह वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. ही रॅली धंतोली, मुंजे चौक, व्हेरायटी चौक, मानव मंदिर, कॉटन मार्केट होऊन मुंजे चौक मार्गे पटवर्धन ग्राऊंडवर रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीदरम्यान गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीबाबतही जनजागृती करण्यात आली. या रॅलीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे ९०० विद्यार्थी आणि २०० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. याशिवाय तहसील पोलीस ठाणे हद्दीतील सिंधी हिंदी विद्यालय येथे दुय्यम पोलीस निरीक्षक जी.एम. मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनच्या कार्यप्रणालीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच झुनझुनवाला कन्या विद्यालय गांधीबाग आणि प्रकाश हायस्कूल नमकगंज येथे सुरक्षा व्यवस्थेबाबत माहिती देण्यात आली.आतापर्यंत सदर पोलीस स्टेशनअंतर्गत अण्णासाहेब गुंडेवार कॉलेज काटोल रोड येथेही शस्त्रांचे प्रदर्शन व शस्त्रांसंबंधी माहिती देण्यात आली. कोतवाली पोलीस स्टेशनअंतर्गत वनिता विकास हायस्कूल गणेशनगर येथील विद्यार्थ्यांना पोलिसांची कार्यपद्धती व शस्त्रांसंबंधी माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)आज समारोप विद्यार्थ्यांना व नागरिकांना पोलिसांच्या कामाची पद्धत माहिती व्हावी, आणि शस्त्रांची माहिती उपलब्ध करून देत त्यांना पोलिसांचे मित्र करण्याच्या उद्देशाने २ जानेवारीपासून विविध पोलीस ठाणे हद्दीत ‘रेजिंग डे’ साजरा केला जात आहे. ८ जानेवारीला याचा समारोप करण्यात येईल.