शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मागितला प्रवेश,मिळाल्या लाठ्या!

By admin | Updated: August 17, 2016 02:05 IST

उपराजधानीतील शासकीय ‘आयटीआय’मध्ये प्रवेशप्रक्रियेदरम्यान तणाव निर्माण झाला. संतप्त विद्यार्थ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

शासकीय ‘आयटीआय’मध्ये तणाव : विद्यार्थी संतप्त, गैरप्रकार झाल्याचा आरोप नागपूर : उपराजधानीतील शासकीय ‘आयटीआय’मध्ये प्रवेशप्रक्रियेदरम्यान तणाव निर्माण झाला. संतप्त विद्यार्थ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या संपूर्ण प्रकारामुळे ‘आयटीआय’ला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. रात्री उशिरापर्यंत संतप्त विद्यार्थी परिसरात उपस्थित होते. ‘आयटीआय’ची प्रवेशप्रक्रिया चार टप्प्यात घेण्यात आली. हे टप्पे आटोपल्यानंतरदेखील १४९ जागा शिल्लक होत्या. या जागांवर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ‘एसएमएस’ करण्यात आले. त्यानुसार विद्यार्थी ‘आयटीआय’मध्ये पोहोचले. अनेक विद्यार्थी तर सोमवारी रात्रीपासूनच रांगेमध्ये लागले होते. मंगळवारी सकाळपासूनच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. शासकीय ‘आयटीआय’मध्ये प्रवेशाची एकच खिडकी होती व विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या वेगवेगळ्या रांगा होत्या. विद्यार्थ्यांचा ‘आॅनलाईन’ अर्ज व कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना प्रवेशासाठी ‘टोकन’ देण्यात येत होते. यावेळी काही विद्यार्थी व बाहेरील व्यक्ती रांगेत शिरून ‘टोकन’ घेत असल्याचे निदर्शनास आल्यावर विद्यार्थ्यांनी आरडाओरड केली. याचदरम्यान, सर्व जागांवर प्रवेश झाले असून आता ‘टोकन’ देण्यात येणार नाही, असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी रांगेमध्ये धक्काबुक्कीदेखील सुरू झाली. कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय नाही यंदा शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची सोय करण्यात आली आहे. मात्र, सगळ्याच विद्यार्थ्यांना शासकीय ‘आयटीआय’मध्ये प्रवेश हवा आहे. ते देणे शक्य नाही. प्रवेश पूर्ण झाल्याचे विद्यार्थ्यांना कळविण्यात आले. कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय व्हावा, असे आम्हाला वाटत नाही. बुधवारपासून सुरू होणाऱ्या खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेशामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल, असे मत शासकीय ‘आयटीआय’चे प्राचार्य प्रदीप लोणारे यांनी व्यक्त केले.